फुलवाडी टोल नाक्यावर आंदोलक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यात बाचाबाची 

काम अर्धवट तरीही  टोल वसुली सुरू 
 
sd
परिसरातील वाहन चालकांना सूट देण्याची मागणी 

अणदूर - अणदूरपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलवाडी टोल नाक्यावर परिसरातील वाहन चालकांची लूट सुरु आहे. दहा किलोमीटरच्या आतील चार चाकी वाहनांना टोल घेऊ नये, असा नियम असताना, दमदाटी करून टोल वसूल केला जात आहे. 

अणदूर व परिसरातील गावातील नागरिक टोल नाका व्यवस्थापनाला टोलमधून सुट मिळण्यासाठी वाहनमालक कागदपत्रे घेवून निवेदन द्यायला गेले असता टोल नाका प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने जमाव व अधिकार्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याने आज टोल नाक्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

       फुलवाडी (ता.तुळजापूर) येथील टोल नाक्याच्या दहा किलोमीटर परिघातील वाहनधारकांना नियमानुसार सुट असताना त्यांच्याकडून सक्तीने टोल वसुली गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे.ती थांबवावी यासाठी अणदूर, फुलवाडी, धनगरवाडी,खुदावाडी, सराटी,शिरगापूर,उमरगा(चि.),केरुर, येथील  वाहनमालकांनी या आगोदर जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक,महामार्ग प्राधिकरण यांना टोळमधून सुट मिळावी म्हणून निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने कांही लोकप्रतिनिधी व वाहनमालक गुरुवारी (ता.२३) वाहने घेऊन कागदपत्रे  देण्यासाठी टोल नाक्यावर गेले होते .

d

दरम्यान नाका व्यवस्थापन व गेलेल्या प्रतिनिधिंशी चर्चा सुरु असताना व्यवस्थापक आरजित दासगुप्ता व रमेश काळे यांनी उद्धट भाषा वापरुन शिविगाळ करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली आहे.यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.या अगोदरही बरेच दिवस या टोलनाक्यावर स्थानिक वाहन धारक यांच्या बरोबर नाका व्यवस्थापनाचे वाद झाले आहेत ,हा प्रश्न वेळीच सोडवणे गरजेचे झाले असून ,प्रश्न चिघळण्याची शक्यता,निर्माण झाली आहे योग्य निर्णय नाही घेतल्यास जवळपास आठ गावातील नागरिक तिव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

अणदूर ते होर्टी या दहा ते पंधरा किलो मीटरचे रस्त्याचे काम अपूर्ण असताना तसेच अणदूरचा उड्डाण पूल कार्यांन्वित झाला नसताना,  सर्व नियम धाब्यावर बसवून फुलवाडी टोल नाका सुरु करण्यात आला. अणदूर ते फुलवाडी टोल नका हे अंतर फक्त साडेपाच किलोमीटर आहे. तसेच नळदुर्ग ते टोल नाका हे अंतर साडेआठ ते नऊ  किलोमीटरअसताना अणदूर आणि नळदुर्गच्या चार चाकी वाहनांना सोलापूरला जाताना ५० रुपये आणि येताना ३० रुपये टोल घेतला जात आहे. 

d

अणदूर ते सोलापूर हे अंतर ४० किलोमीटर आहे. अणदूरचा दैनंदिन संबंध सोलापूर शहराशी जोडलेला आहे. खरेदीसाठी किंवा आजारी लोकांच्या  उपचारासाठी सोलापूरला जावे लागते,एक तर दर महिन्याला २७५ रुपयाचा पास घ्या नाही तर जाताना ५० रुपये आणि येताना ३० रुपये टोल द्या, म्हणून दमदाटी करून टोल  वसूल केला जात आहे.

अणदूर उड्डाण पुलाचे काम रखडले

अणदूर हे जवळपास २५ ते ३० हजार लोकवस्तीचे गाव आहे. अणदूरच्या उड्डाण पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सध्या हे काम बंद आहे. उड्डाण पूलाचे काम रखडल्यामुळे जवाहर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थाना जाताना तसेच या परिसरातील लोकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. 

अणदूर ते होर्टी  या  दहा ते पंधरा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम सध्या  बंद आहे. तसेच चिवरी पाटीजवळ पाण्याचा निचरा होत नाही. तसेच या ठिकाणी सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे येथे अनेक अपघात होत आहेत. 


टोल नाक्यावर शौचालय नाही 
टोल नाक्यावर शौचालय , मुतारी तसेच पाण्याची सोय नाही. येथे कामावर असलेले कर्मचारी मालकाच्या जीवावर दमदाटी करून अरेरावी करीत आहेत. तसेच या ठिकाणी अनेक वेळा फास्ट ट्रॅक स्कॅन होत नसल्याने वाहनाच्या रांगा लागत आहेत. 

From around the web