महिलांनी पुढे येऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करावेत  - अस्मिता कांबळे 

दहिफळ येथे प्रगती महिला उमेद ग्रामसंघ अंतर्गत घरकुल मार्टचा उदघाटन सोहळा
 
महिलांनी पुढे येऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करावेत - अस्मिता कांबळे

कळंब -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोननती अभियान उमेद अभियानांतर्गत प्रगती महिला ग्रामसंघ, दहिफळ च्या माध्यमातून घरकुल मार्ट हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी भाग्यश्री मते या स्वयं सहाय्यता बचत गटातील युवतीने पुढाकार घेतला आहे. कळंब तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले.

घरकुल मार्टचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या माजी जि प उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी कुसनेनीवार, MSRLM चे जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड, अमोल शिरसाठ जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक गुरू भांगे, सरपंच चरणेश्वर पाटील, मिनाक्षी लामतुरे वैद्यकीय अधिकारी, हनुमंत झांबरे ग्रामविकास अधिकारी, सचिन ठोकळ, तेजस कुलकर्णी, शिल्पा पाटील माजी सरपंच,आदी मान्यवर व मोठ्या संख्येने बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

उदघाटन प्रसंगी बोलताना अध्यक्षा कांबळे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करून आपली प्रगती करावी. स्वतःच्या पायावर उभरून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलेच्या मागे जिल्हा परिषद व उमेद अभियान कायम उभे राहत असल्याचे अस्मिता कांबळे यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांनी पुढे येऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करावेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हवी ती मदत करण्यासाठी माझा प्रयत्न असेल अशा कांबळे म्हणाल्या.

घरकुल मार्ट चालविणाऱ्या भाग्यश्री मते या युवती ही जिम्मेदारी योग्य प्रकारे पार पडतील अशी अपेक्षा यावेळी अर्चना पाटील यांनी व्यक्त केली तसेच
गावच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमासाठी प्रशासना सोबत जातीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच दहिफळ गावातील महिलांकडून कायम मागणी होत असलेल्या ग्राम संघाच्या कार्यालयासाठी ग्राम पंचायतने जागा उपलब्ध केल्यास आवश्यक निधी  उपलब्ध करून देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना जिल्हा अभियान समन्वयक समाधान जोगदंड यांनी उपक्रमाबद्दल सांगितले की, 
केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री अवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, कोलाम आवास योजना इत्यादी योजना घरकुलासाठी राबविण्यात येतात, या योजनांची अंमलबजावणी गतिमान व गुणवत्तापूर्वक होण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये माह आवास अभियान ग्रामीण भागात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

घरकुल मार्ट च्या माध्यमातून घरकुल लाभार्थींना घर बांधण्यासाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना घराकुलाकरिता लागणारे सर्व साहित्य जवळपासच्या मोठ्या व्यापारी गावावरून अनावे लागत आहे. यामध्ये लाभार्थ्यांचा वाहतुकीचा खर्च तसेच वेळ सुधा वाया जात असे. घरकुल मार्ट मूळे आता लाभार्थ्यांना हा त्रास वाचणार आहे. याचा फायदा दहिफळ परिसरातील आसपासच्या गावांना पण होणार आहे.

यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी कुसनेनिवार, गुरू भांगे, तेजस कुलकर्णी यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले, प्रास्ताविक ठोकळ यांनी केले.
  
यावेळी माजी सरपंच शिल्पा पाटील, उप सरपंच अभिनंदन मते, ग्राम पंचायत सदस्य, घरकुल मार्टच्या प्रोप भाग्यश्री मते, प्रगती महिला उमेद ग्रामसंघाच्या अध्यक्षा अंजली ढवळे, पल्लवी कुटे, कल्पना मते, प्रीती पाटील, श्र्वेता कुटे, पुनम गोरे, स्वाती भातलवंडे, आशा कार्यकर्ती व मोठ्या संख्येने गावातील महिला व प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

From around the web