मागितली लस, मिळाला पोलिसांच्या लाठीचा प्रसाद  ... 

उस्मानाबादेत लस घेण्यासाठी गेलेल्या  ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांचा लाठीमार 
 
मागितली लस, मिळाला पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ...
लाठीमारात प्रदिप सुरवसे यांचे दोन्ही पाय निकामी, ऑपरेशन करण्याची वेळ 

उस्मानाबाद- कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस  घेतलेल्या नागरिकांना दीड  महिना झाला तरी लसीच्या दुसऱ्या डोस साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडेउस्मानाबादेत  लसीसाठी लांबच्या लांब रांग लागत आहे, मंगळवारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात ज्येष्ठ नागरिक प्रदिप सुरवसे यांचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यांच्यावरऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. 

उस्मानाबादेत लस वाटप बाबत  प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरु आहे.. दिनांक 12 मे रोजी ( मंगळवारी ) रोजी कोवीड-19 च्या दुसऱ्या लसीचा डोस घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जेष्ठ नागरिक (  वय 45 वर्षावरील सव्याधी असलेले लोक ) पहाटे पासून तिष्ठत उभे असतांना झालेल्या गोंधळात  रांगेतील प्रदिप आण्णासाहेब सुरवसे यांना पोलीस कर्मचारी सुनिल कल्याण कोळेकर यांनी बेदम मारहाण केली. त्यात प्रदिप सुरवसे याचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे त्यांना पायावर ऑपरेशन करण्याची वेळ आली. 

 याबाबत सुरवसे यांनी पोलीस अधिक्षक व जिल्हधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर दवाखान्यात  उपचार करण्यात आले आहेत . सदरची घटना कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी  प्रदिप सुरवसे यांची भेट घेवून विचारपूस केली.  सर्व घटना समजून घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार व संबंधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी, असे प्रशासनास मागणी करणार असल्याचे  काळे यांनी सांगितले.   यावेळी अॅङ नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठ, मोहन कुलकर्णी, सुनिल गवळी, रोहीत देशमुख उपस्थित होते.  


 

From around the web