शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची कोविड केंद्रात नियुक्ती

 
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची कोविड केंद्रात नियुक्ती

उस्मानाबाद -जिल्हयात दिवसेदिवस कोविडचे रुग्ण वाढत असल्याने उस्मानाबाद शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात आणि जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी याच महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची सेवा घेण्यात आली आहे.याबाबतचे आदेश काढुन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.

    येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टारांची सेवा आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार अधिगृहीत करण्यात आली आहे.त्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या डॉक्टरांना जिल्हा शासकीय रुग्णालयामधील डिसीएच (DCH) येथे आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालयामधील डिसीएचसी (DCHC) येथे कोविड -19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

         आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, कोविड उपाय योजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे या आदेशात म्हटले आहे. 

From around the web