कोरोना केंद्रांच्या तपासणीसाठी आठ तालुक्यांसाठी पथकांची नियुक्ती

 
कोरोना केंद्रांच्या तपासणीसाठी आठ तालुक्यांसाठी पथकांची नियुक्ती

उस्मानाबाद - गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.जिल्हयातील विविध ठिकाणच्या इमारती आणि आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) आणि डेडीकेटेड कोविड केअर (DCCC) सेंटरमधील सोयी,सुविधांवर नियंत्रण राहावे,या सेंटरची कामे सुरळीत सुरु  व्हावीत म्हणून त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हयातील आठ तालुक्यांसाठी आठ पथकांची नियुक्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.

याबाबत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्‍त कार्यालयाने जिल्‍ह्यातील सर्व DCHC व CCC वर अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पथक नेमूण तपासणी करण्याबाबत सुचित केले आहे.त्‍या अनुषंगाने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सर्व DCHC व CCC यांची तपासणी करण्‍यासाठी पुढील प्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.नियुक्‍त पथकातील अधिकारी,कर्मचारी यांनी  CCC / DCHC केंद्राच्या चौकशी फॉर्मेट नुसार आठवड्यातून एकदा (गुरुवारी) तपासणी करुन त्‍याबाबतचा अहवाल दि. 25,31 मार्च व दि.08,15 एप्रिल रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावयाचा आहे.

नेमण्‍यात आलेल्‍या पथकातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम,CCC, DCHC तपासणीसाठी नेमूण देण्‍यात आलेले तालुके पुढीलप्रमाणे आहेत.

उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,(पथक प्रमुख) नायब तहसीलदार तुषार बोरकर,  अव्वल कारकून एस.स्‍वामी,लिपीक एस. ए. तुगावे,(उस्मानाबाद) उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे,(पथक प्रमुख),नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे,अव्वल कारकून अशोक शिंदे, अव्वल कारकून व्हि.सी.कोकाटे,(तुळजापूर),उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,(पथक प्रमुख) नायब तहसीलदार संभाजी थोटे, अव्वल कारकून के.के.कुलकणी,अव्वल कारकून ए. बी. पटेल, (उमरगा) उपजिल्‍हाधिकारी(सा.प्र.) सचिन गिरी, (पथकप्रमुख),नायब तहसीलदार आर.आर. शिराळकर, अव्वल कारकून, एम.जी.जाधव, अव्वल कारकून एम.एल.मैदपवाड,(लोहारा), उपविभागीय अधिकारी श्रीमती मनिषा राशिनकर, (पथक प्रमुख), नायब तहसीलदार पी. व्‍ही. सांवत,अव्वल कारकून डी.एस. पवार, अव्वल कारकून अश्विनकुमार कांबळे,(भूम),उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती शुभांगी आंधळे, (पथक प्रमुख), नायब तहसीलदार सुजित वाबळे,अव्वल कारकून हरिश्‍चंद्र मुळे, अव्वल कारकून दिपक चिंतेवार,(परंडा),उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्‍या गाठाळ,(पथक प्रमुख),नायब तहसीलदार अस्‍लम जमादार,अव्वल कारकून नेताजी गायकवाड, अव्वल कारकून वाय.व्‍ही. हारकर, (कळंब),जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्रीमती चारुशिला देशमुख,(पथक प्रमुख),नायब तहसीलदार श्रीमती सुजाता हंकारे,अव्वल कारकून सचिन पाटील, अव्वल कारकून एम. जी. शिंदे, (वाशी).           

       तपासणी पथकास तपासणी अंती सुविधांबाबत काही अडचण येत असल्‍यास, अन्‍य सोयी सुविधा अपुरी पडत असल्‍यास त्‍याबाबत संबंधित यंत्रणा व नगर परिषद,नगर पंचायत कार्यालयातील संबंधित कर्मचा-यास संपर्क करुन उक्‍त सुविधा पुरविण्‍यात येईल, याबाबत खात्री करण्‍यात यावी. तसेच सोयी सुविधा पुरविण्‍याबाबत काही गंभीर प्रश्‍न निर्माण होत असल्‍यास या बाबत तात्‍काळ या कार्यालयाच्‍या निदर्शनास आणून द्यावी आपल्‍या जिल्‍ह्यातील सर्व CCC व  DCHC येथील प्रभारी अधिकारी यांच्या संपर्कात राहून वर नेमूण दिलेल्‍या दिनांकाव्‍यतिरिक्‍त इतर दिवशीही काही अडचण निर्माण झाल्‍यास त्‍यांचे निराकरण करुन अहवाल तात्‍काळ जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत.आवश्‍यतेनुसार केंद्र वापरासाठी सुसज्‍ज राहतील याबाबत दक्षता घेण्‍यात यावी आणि  या बाबतचा अहवाल वेळोवेळी सादर करावा,असेही या आदेशात म्हटले आहे.
 

From around the web