महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य  योजनांच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती

 
महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील विविघ रुग्णालयांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध उपचारांसाठी तसेच कोरोना संदर्भातील जिल्ह्यातील डेडीकेटेड कोव्हिड केंद्रात  जातात. या रुग्णांना शासन निर्णयानुसार सर्व अंगीकृत रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी आणि  कोविड उपचार घेणाऱ्या  रुग्णांना आणि  त्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नयेत यासाठी रुग्णालयांमध्ये मदत कक्ष स्थापन करून त्यासाठी  तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हधिकारी कौस्थुभ दिवेगावकर यांनी दिले आज आहेत .

          या  पथकात अधिकारी, ऑडिटर, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .अधीकारी -- कर्मचाऱ्यांच्या  नावासमोर दर्शविलेल्या रुग्णालयामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

पथक प्रमुख : सुरेश केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.उस्मानाबाद. (मो.क्र. 982281972) यांच्या मार्फत पुढील नमुद पथकाने नेमून दिलेले काम पूर्ण करुन अनुपालन अहवाल सादर करावा असे, जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी आज आदेश दिले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष पाटील (मो.क्र.7020005146), जिल्हा कोषागार कार्यालयातील शफीक कुरणे (मो.क्र. 9421356944)

निरामय हॉस्पिटल : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रोहन काळे (मो.क्र. 9422742675), सहाय्यक लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा ए.एस. भोंडे (मो.क्र. 8668271166)

पल्स हॉस्पिटल : निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील चेतन पाटील (मो.क्र. 8668809209), सहाय्यक लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा जी.एस.कुलकर्णी (मो.क्र. 9730702552)

 सुविधा हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती प्रियंका लोखंडे (मो.क्र. 9892566075), स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील वरीष्ठ लेखा परिक्षक एस.टी . मुंडे (मो.क्र. 9922129697)

सह्याद्री हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे (मो.क्र. 9422070948), स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील वरीष्ठ लेखा परिक्षक व्ही.बी. पांचाळ (मो.क्र. 9423499585)

चिरायु हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.डी.बोथीकर (मो.क्र. 9112398716), जिल्हा परिषदेतील सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक लेखा अधिकारी जी.एल. चव्हाण (मो.क्र. 9421858655)

वात्सल्य हॉस्पिटल : उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार एम.के. पाटील, स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक एन.एम. बडुरकर (मो.क्र. 9890798217)

‍शिवाई हॉस्पिटल : उमरग्याचे नायब तहसीलदार एस.एस.धोटे, उस्मानाबाद येथील स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक  भोपळे (मो.क्र. 9922761506)

डॉ.के.डी. शेंडगे हॉस्पिटल : उमरग्याचे नायब तहसीलदार एन.आर. मंल्लुरवार, उस्मानाबाद येथील स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक  व्ही.एल. शिवपुजे (मो.क्र. 8308559826)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समन्वयक : जिल्हा समन्वयक विजय भुतेकर (मो.क्र. 7888139622)

          वरीलप्रमाणे नियुक्त सर्व नायब तहसीलदार, ऑडिटर आणि जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य याबाबत वरीलप्रमाणे आपापल्या विषयाच्या अनुषंगाने विहित कालमर्यादेत पार पाडून शासनाच्या प्रचलित नियमानुसार तपासणी करुन पथक प्रमुखांमार्फत दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावा असेही श्री. दिवेगावकर यांनी आदेशित केले आहे.

          उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थाकपन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असेही श्री.दिवेगावकर यांनी  सांगितले आहे.

From around the web