कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
उस्मानाबाद - कोरोनाच्या संसर्गाविरुध्द जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एसओपी (SOP) ची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.
या आदेशाप्रमाणे अधिकारी आणि त्यांना सोपविलेल्या जबाबदाऱ्या अशा- पोलिस अधीक्षक : यांनी कायदा व सुव्यस्था संनियंत्रण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी : दैनंदिन आढावा, चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प.यंत्रणेवर सर्वसाधारण नियंत्रण, अप्पर जिल्हाधिकारी : यांनी जिल्हा रुग्णालयांवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवणे, कोविड उपचारांवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी : यांनी सर्व यंत्रणावर सर्वसाधारण सनियंत्रण ठेवणे. एसडीआरएफ मधून आवश्यक निधीची मागणी करणे व आर्थिक तरतूद करणे. उपविभागीय अधिकारी , पालक अधिकारी, तहसीलदार : यांनी उपविभागातील कोविड-19 च्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे व अडचणींचे निराकरण करणे. कोविडचे सर्वसाधारण नियंत्रण व सीसीसीचे नियंत्रण करणे, सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची तपासणी करणे. आयएमए तालुका गटांशी संपर्कात राहून कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे.पोलिस स्टेशन निहाय कार्यवाहीची आखणी करुन देणे, लग्न समारंभ तसेच इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करणे, मास्क न वापरणाऱ्यांना दंड करणे, गुन्हे दाखल करणे, मिरवणूका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा, उपोषणे व इतर सामुहिक कार्यक्रम व राजकीय, सामाजिक , धार्मिक कार्यक्रमांस प्रतिबंध करणे.
जिल्हा शल्य चिकित्सक : यांनी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यावर सनियंत्रण ठेवणे, कोव्हिड रुग्णांची तपासणी करुन वर्गवारी (Sever, Moderate mild) करण्याची कार्यवाही करणे, पूर्वीप्रमाणे जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय सुरु राहण्याबाबत व रुग्णांवर उपचार करण्याबाबत दक्षता घेणे, आयसीयु युनिट तयार करुन एकेका वैद्यकीय अधिकारी यांचेवर जबाबदारी देणे व त्यांचेवर सनियंत्रण ठेवणे, ऑक्सीजन पुरवठा, औषधे पुरवठा सुरळीत ठेवणे, सीसीसी चे नोडल वैद्यकीय अधिकारी यांचे नाव मोबाईल क्रमांकासह यादी तयार करुन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे. जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी : यांनी पीएचसी चे सनियंत्रण व जबाबदारी पार पाडणे, सर्व टीएचओ व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सनियंत्रण ठेवणे, डीसीएच व डीसीएचसी आणि सीसीसी चे सर्व सनियंत्रण ठेवणे, ऑक्सीजन पुरवठ्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविणे व इतर कार्यवाही करणे, सीसीसी चे नोडल वैद्यकीय अधिकारी यांच्या नाव मोबाईल क्रमांकासह यादी तयार करुन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.
उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, ठाणे अंमलदार, पोलिस निरीक्षक (वाहतूक शाखा) : यांनी पोलिस स्टेशन निहाय महसूल, पोलिस, न.प. यांचे कर्मचाऱ्यांसह कार्यवाही पथक तयार करणे व कार्यवाही करणे, लग्न समारंभ तसेच इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करणे, मास्क न वापरणाऱ्यांना दंड करणे, गुन्हे दाखल करणे, मिरवणुका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा, उपोषणे व इतर सामुहिक कार्यक्रम व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांस प्रतिबंध करणे, एस.टी., बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, जीप (टॅक्सी) यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यास बंदी करणे, क्षमतेच्या जास्त प्रवासी बसल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कार्यवाही करणे. पंचायत समिती गट विकास अधिकारी : यांनी कोविड-19 च्या चाचण्या वाढविणे, आठवडी बाजार बंद करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी , लसीकरण, गृह विलगीकरण ची कार्यवाही करणे,कोविड केअर सेंटर व्यसस्थापन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविणे, भाजीपाला मार्केट, आठवडी बाजार, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल या ठिकाणी नियंत्रण, मास्क न वापरणाऱ्यांना दंड करणे, गुन्हे दाखल करणे.
मुख्याधिकारी, नगरपरिषद, नगर पालिका,नगर पंचायत : यांनी कोविड-19 च्या चाचण्या वाढविणे,आठवडी बाजार बंद करणे, गृह विलगीकरण ची कार्यवाही, कोविड केअर सेंटर व्यवस्थापन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविणे,रात्रीची संचारबंदी अंमलबजावणी, सुपर स्प्रेडर्स तपासणी इत्यादींची तपासणी करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अमलबजावणी, भाजीपाला मार्केट, आठवडी बाजार, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल या ठिकाणी नियंत्रण, मास्क न वापरणा-यांना दंड करणे, गुन्हे दाखल करणे, सार्वजनिक उद्यानांची तपासणी, सिनेमागृहे तपासणी. तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविणे,प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय कोविड चाचण्या, गृह विलगीकरण ची कार्यवाही, कोविड केअर सेंटर बेड्स व्यवस्थापन, ऑक्सीजन बेड्स व्यवस्थापन, सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी, पॅथोलॉजी लॅब इत्यादींची माहिती घेणे.
वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये : यांनी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमधील टेस्टिंग सेंटर्सवर येणा-या रुग्णांची रॅपीड अँन्टीजन टेस्ट, आरटीपीसीआर तपासणी, ऑक्सीजन बेड्स व्यवस्थापन, सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी, पॅथोलॉजी लॅब इत्यादींची माहिती घेणे, Ganeral Practioner डॉक्टरांकडे उपचारासाठी येणा-या प्रत्येक रुग्णांपैकी लक्षणे असलेल्या संशयीत साणांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे व खाजगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे, सीसीसी चे वैद्यकिय सुविधा, औषधोपचार,अन्नपुरवठा,स्वच्छता व इतर बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे,ऑक्सीजन बेड,व्हेंटीलेटर बेड व्यवस्थापन करणे. भूसंपादन मध्यम प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हानवर यांनी ऑक्सीजन व्यवस्थापन व ऑक्सीजन पुरवठा सुरळीत राहण्याबाबत कार्यवाही करावी. तामलवाडी ऑक्सीजन प्लांट येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णांसाठीउ पुरेसा ऑक्सीजन पुरवठा होत राहील याची दक्षता घ्यावी.
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन : यांनी उपहार गृहे, हॉटेल, रेस्टॉरंट व तत्सम ठिकाणे तपासणी करावी आणि नगर परिषद हद्दीत सदर ठिकाणे कर्फ्यूच्या वेळेत बंद राहतील याकडे लक्ष द्यावे. राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक : यांनी बार, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, रिसॉर्ट, क्लब मधील बाहेरील एफ अँण्ड एल लायसन्सधारक युनिट, आऊटलेटसह तपासणी करावी. सहायक नियंत्रक वैद्यमापन (वजने व मापे) : यांनी किराणा मालाच्या दुकानांची तपासणी करावी. नो मास्क नो एन्ट्रीचे पालन होते की नाही याबाबत कार्यवाही करावी. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक : यांनी शाळा, कॉलेज तपासणी करावी. खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परिक्षा केंद्रे तपासणी करावी. जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी यांनी क्रीडांगणे खेळाडूंना केवळ क्रीडा प्रकारांचे सरावासाठी उपलब्ध करुन द्यावेत. तसेच मोठ्या स्पर्धा आयोजित न करणे व प्रेक्षकांना क्रीडांगणावर परवानगी देऊ नये. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : यांनी एस.टी., बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, जीप (टॅक्सी) यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यास बंदी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कार्यवाही करणे. आगार व्यवस्थापक, रा.प.म. (सर्व ) : यांनी बसस्थानकावरील गर्दीचे नियंत्रण करावे. प्रवाशांना मास्कची सक्ती करणे, नो मास्क नो इन्ट्री नियमाची अंमलबजावणी करणे. बसमध्ये अनुज्ञेय प्रवाशापेक्षा जास्त प्रवाशांना प्रवेश देण्यात येऊ नये, बस स्थानकावर प्रवाशांकडून सामाजिक अंतराचे पालन होईल या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी. बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याच्या कामावर देखरेख करावी.
या नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे. तसेच नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त इतर अधिकारी तसेच कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार नियुक्ती करावयाची आहे. अधिनस्त साधनसामुग्रीचा यथोचित वापर करुन त्यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावा, असेही या आदेशात म्हटले आहे.