कोविड प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 
कोविड प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

उस्मानाबाद -  जिल्ह्यात दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्याच्या प्रादुर्भावात वाढ होऊ न देता वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी  नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नोडल अधिकाऱ्यांचे पदनाम,नाव आणि त्यांना नेमून दिलेले कामकाज अशी  आहेत-

        जिल्हा पोलिस अधीक्षक  राज तिलक रौशन उस्मानाबाद व त्यांच्या अधिनस्त पोलिस यंत्रणांतर्गत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करणे.कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे.गर्दी न होऊ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.

      जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, Data Management Teamचे प्रमुख म्हणून कामकाज पाहतील.जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),नितीन दाताळ,जिल्हा सांख्यिकी अधिकारी वामन जाधव,अतिरिक्त जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांनी  वेळच्या वेळी Data (Testing data, Vaccination  data) अद्यावत केला जाईल याबाबत पर्यवेक्षण करतील.ग्रामीण भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अंमलबजावणीबाबत आवश्यक कार्यवाहीकरण्याचे काम करतील.

     अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले या जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील कामकाजाचे पर्यवेक्षण व समन्वय करतील.निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  आणि जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागामधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन्स,प्रतिबंधात्मक उपाययोजना (curfew measures) याबाबत आवश्यक कार्यवाही करावयाचे आहे.

 तहसीलदार, गट विकास अधिकारी, पं.स., मुख्याधिकारी, न.प./न.पं. हे अंमलबजावणी करतील. त्यांच्यावर पर्यवेक्षण व नियंत्रण करावयाचे आहे.जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे यांनी लसीकरणाची गती वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावयाची आहे तर जिल्हा लसीकरण अधिकारी श्री. के. के. मिटकरी लसीकरण केंद्र व नमुना (swab) संकलन केंद्र वेगवेगळे ठेवणे.उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. 2.) राजकुमार माने यांनी ऑक्सीजन पुरवठा,उपलब्धता,आवश्यकता याबाबत दैनंदिन आढावा घेणे व नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

        जिल्हा रुग्णालयांचे जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय पाटील व्हेंटीलेटरची उपलब्धता, आवश्यकता,दुरुस्ती याबाबत आवश्यक कार्यवाही करणे.वैद्यकीय सुविधा, साधनसामुग्रीची उपलब्धता,आवश्यकता, पुरवठा याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंचे डेथ ऑडिट तातडीने पूर्ण करुन घेणे व त्याबाबत अचूक रिपोर्टींग करणे. निवासी वैद्यकीय अधिकारी सचिन बोडके आणि जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना श्री.भुतेकर यांनी बेड्स कॅपॅसिटी वाढविणेबाबत आवश्यक कार्यवाही करणे.जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, उपरोक्त आठही  नोडल अधिकारी व टीम्स शी संपर्कात राहून माध्यमांना माहिती वेळेत पोचवण्याची दक्षता घ्यावयाची आहे,असेही  या आदेशात म्हटले आहे.

                                         

  

From around the web