जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची नियुक्ती 

 
s

उस्मानाबाद  - मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते समाजसेवक मसूद शेख यांची जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

जमीयत उलेमा महाराष्ट्राच्या गव्हर्निंग कौन्सिलची दारुल उलूम सोनोरी ( जिल्हा अकोला )  येथे बैठक पार पडली.  या बैठकीत  जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली तर मसूद शेख यांची मराठवाडा सचिवपदी प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. 

d


मसुद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव असून त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय प्रवासाची सुरुवात उस्मानाबाद येथे करुन अवघ्या महाराष्ट्रात मुस्लिम समाजात नावलौकिक मिळवले आहे, सामाजिक सौहार्द व बांधिलकी जपणा-या मसुद शेख यांच्या कामाची दखल घेत जमियत उलेमा सारख्या देशाभरात समाजकार्य करणा-या संघटनेने त्यांच्यवर मराठवाडा भागात सचिवपदी नियुक्ती करुन निश्चितच समाजकार्यला बळ दिले असल्याची भावना नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे. 

From around the web