अणदूर अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नियुक्त करा...  

 ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 
 
अणदूर अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नियुक्त करा...

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी  न्यायालयीन कामकाजाकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम किंवा ऍड उमेशचन्द्र यादव यांच्यासारख्या तज्ञ विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी अणदूर ग्रामस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली. 

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर  27 जानेवारी 2021 रोजी तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. 

या अत्याचार प्रकरणी  पीडित कुटुंबासह अणदूर ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. पीडित कुटुंबांना न्याय मिळावा याकरिता या प्रकरणाचे  न्यायालयीन कामकाज निष्पक्षपाती  होणे गरजेचे आहे . याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम किंवा ऍड. उमेशचन्द्र यादव यांच्यासारख्या तज्ञ विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी , अशी मागणीही करण्यात आली आहे. 

निवेदन देतेवेळी ऍड. दीपक आलुरे, साहेबराव घुगे, माणिक आलुरे, दयानंद मुडके, सोमनाथ शेटे,  भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.  


अणदूर अत्याचार प्रकरणी अणदूरमध्ये रविवारी बंद पाळण्यात आला होता तसेच निषेध मोर्चा काढून आरोपीवर कडक कारवाई  करण्याची मागणी करण्यात आली होती. तिसरा आरोपी नळदुर्ग पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

चित्रा वाघ यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट 

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अणदूर गावाचा धावता दौरा करून, पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, महिला आघाडीच्या  माजी जिल्हाध्यक्ष क्रांती थिटे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आपण आणि आपला पक्ष पीडित मुलीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मोकाट आरोपीला अटक करावी, यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणार आहे. 

या अत्याचारामुळे  पीडित  मुलीवर विपरीत परिणाम झाला असून , तिला बाहेर काढण्यासाठी शाळेत पाठवणे आवश्यक आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 

अणदूर अत्त्याचार प्रकरणा तील तिसऱ्या आरोपीला ता त्काळ अटक करावी, या मागणीसाठी अणदुरमधील नागरिकांनी मंगळवारी नळदुर्ग पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले . यावेळी अांदोलनकर्त्यांना भाजपच्या वाघ यांनी भेट दिली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्याशी चर्चा केली. 


पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अणदूर येथील अत्याचारीत मुलीच्या तिसऱ्या आरोपीला तत्काळ पकडावे, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून खटला लढण्यासाठी उच्च दर्जाच्या वकिलांची नेमणूक करावी, पीडितेला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली. 

From around the web