मतदार यादीसाठी रंगीत छायाचित्र देण्याचे आवाहन

 
मतदार यादीसाठी रंगीत छायाचित्र देण्याचे आवाहन

उस्मानाबाद  -उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद तालुक्यातील 241-.तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट गावातील नागरिकांना या दोन्ही मतदारसंघाअंतर्गत असलेल्या गावांतील मतदार यादीच्या विविध भागातील ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीमध्ये नाही. त्यांनी तातडीने रंगीत छायाचित्र द्यावेत, असे  आवाहन उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले.अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

तथापि,या ठिकाणी सदरहू मतदारांचा संपर्क होऊ शकत नसल्याने संबंधितांचे रंगीत छायाचित्र उपलब्ध होऊ शकत नाहीत.त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादी रंगीत छायाचित्र अद्यावतीकरण करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन संबंधित मतदारांची यादी या कार्यालयाकडून बनविण्यात आली आहे. ती तहसील कार्यालयात आणि उस्मानाबाद पंचायत समिती कार्यालयात दि.25 मार्च-2021 रोजी डकवून तसा पंचनामा करण्यात आलेला आहे.

या यादीत समाविष्ट मतदरांनी आपले अलीकडील काळातील छायाचित्र सात दिवसांच्या आत आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत अथवा तहसील कार्यालय (निवडणूक विभाग)या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उस्मानाबादेचे तहसीलदार यांनी केले आहे.

From around the web