शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

30 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत
 
s
युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार

 उस्मानाबाद -राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.या पुरस्कारासाठी आपला परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दि.30 जूनपर्यंत सादर करावा, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.यंदापासून युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध कृषी पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दरवर्षी शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

पुरस्काराचे नाव,देण्यात येणा-या पुरस्कारांची संख्या,पुरस्कार रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

1.डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार-01 (राज्यातून एक) ७५ हजार रुपये 2. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५० हजार रुपये 3.जिजामाता कृषीभुषण पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५० हजार रुपये 4.कृषीभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५० हजार रुपये 5. युवा शेतकरी पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) 30 हजार रुपये.6.वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) 3० हजार रुपये 7.उद्यान पंडीत पुरस्कार-08 (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) २५ हजार रुपये.8. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 01 याप्रमाणे ०६ असे एकूण 40) 11,000.9. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-09 (आठ कृषी विभागातून प्रत्येकी 01-अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे-8तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण-9)

    राज्यातील सर्व शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी नवीन शासन निर्णयानुसार दि.15 फेब्रवारी 2021 अन्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे एकूण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.

      सर्व शेतकरी, शेतकरी गट/संस्था यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहून कृषी पुरस्कारासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दि.30 जूनपर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.                    

From around the web