चारा पिकांचे बियाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 
चारा पिकांचे बियाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद -राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock  Mission) 2020-21 अंतर्गत वैरण बियाणे प्रापण, संकलन व  वितरण या योजनेखाली  उस्मानाबाद जिल्हयातील अनुसुचित जाती,जमाती प्रवर्गातील पशुपालक शेतक-यांना  सुधारीत जातीच्या चारा पिकांच्या बियाण्याचे आणि बहुवार्षिक चारा पिकांच्या ठोंबाचे वाटप शंभर टक्के अनुदानावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर करण्यात येत आहे. प्रती 10 गुंठे (10आर) जमीनीच्या क्षेत्रासाठी चारा पिकांच्या बियाण्याचे आणि ठोंबाचे वाटप करण्यात येत आहे.10 गुंठे क्षेत्रासाठी बारामाही सिंचनाची सुविधा असलेल्या पशुपालकांना बहुवार्षिक चारा पिकांच्या ठोंबाच्या वाटण्यासाठी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले आहे.

         ईच्छूक लाभार्थांनी अर्जाच्या स्वरूपातील  प्रस्ताव  नजीकच्या  पशुवैद्यकीय  दवाखान्यामार्फत संबंधित  तालुक्याचे  पशुधन  विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती  यांच्याकडे दिं.05 एप्रिल-2021 ते  दि.04 मे-2021 पर्यंतच्या कालावधीत  सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे,अटी  व  शर्ती याबाबतचा तपशील लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. 

       अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा अनुसूचीत जाती  प्रवर्गातील पशुपालक,शेतकरी या लाभार्थीनी जास्ती जास्त प्रमाणात लाभ घ्यावी,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी  केले. 

From around the web