उस्मानाबादचे आणखी एक जावई उस्मानाबाद दौऱ्यावर 

एकाच दिवशी दोन जावई  उस्मानाबाद जिल्ह्यात 
 
topes
राजेश टोपे यांचा शुक्रवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा

  उस्मानाबाद - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उस्मानाबादचे जावई  अजित पवार शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि उस्मानाबादचे जावई  राजेश टोपे हे देखील शुक्रवार दि,. 18 जून रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्याचा दौरा पुढील प्रमाणे-  .टोपे यांचे शासकीय विमानाने सकाळी 7.50 वा औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार असून अंकुशनगर,बीड मार्गे शासकीय वाहनाने दुपारी 12.45 वा गिरवली  (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार असून 1.45 वाजेनंतर त्यांचे गिरवली  येथून उस्मानाबादकडे प्रस्थान होणार आहे.दुपारी 2.45 वा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होणार असून दुपारी 3.00 वा कोरोना आढावा आणि खरीप हंगाम बैठकीस उपस्थित राहणार आहेत.  सायंकाळी 5.15 वा शासकीय वाहनाने जालन्याकडे प्रयाण करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार  उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दि.18 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे शासकीय विमानाने मुंबईहून सकाळी 7:50 वाजता औरंगाबाद येथे आगमन होणार आहे.

औरंगाबाद  येथून मोटारीने बीड येथून 12:45 वाजता गिरवली  (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार आहे.12:45 ते 1:45 या कालावधीत माजी आमदार राहूल मोटे यांच्याकडे त्यांचा वेळ राखीव आहे.गिरवली येथून दुपारी  2:45 वाजता त्यांचे उस्मानाबाद येथे आगमन होणार आहे. दुपारी 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्हयातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थीतीचा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत.दुपारी 4:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. सायंकाळी 5:15 वाजता .पवार मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील.

From around the web