अणदूरच्या तरुण सराफाची आत्महत्या 

व्यावसायिक पार्टनरकडून फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल  
 
अणदूरच्या तरुण सराफाची आत्महत्या
दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

अणदूर - येथील युवा सराफ  श्रीकांत रविंद्र पोतदार (वय ३५) याने व्यावसायिक पार्टनरकडून अर्थिक फसवणूक झाल्याने बुधवारी (दि.२४) रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

श्रीकांत पोतदार यांंचे नळदुर्ग येथे सराफाचे दुकान होते.त्यात त्यांची डिसेंबर २०१७ पासून मोठी अर्थिक फसवणूक झाली होती व मानसिक त्रास देत असल्याचे वेळोवेळी घरी बोलून दाखवले होते व शेवटी नैराश्यातून त्यांनी चिवरी-उमरगा शिवारातील आपल्या शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

श्रीकांत यांनी मृत्यू समयी सुसाईड नोट लिहून ठेवली होती . त्या त्यांनी नळदुर्ग येथील नगर परिषद जागा क्रमांक ९२२ व ९२२/१ या दोन्ही जागेचे क्षेत्रफळ २८.१० ही जागा त्यांचे व्यवसायिक पार्टनर जमीर जाहीरौद्दीन शेख यांच्या नावे परत करण्याच्या आटीवर जागा केली मात्र जमीर शेख व साहेबलाल शेख यांनी या जागेवर कर्ज काढले ते कर्ज फेडूनही साहेबलाल शेख व जमीर शेख यांनी ती जागा परस्पर विक्री केली त्यामुळे श्रीकांत जागेची  वेळोवेळी मागणी केली मात्र जागा न मिळाल्याने साहेबलाल शेख यांनी माझी फसवणूक केली असून हेच माझ्या मृत्यूस जबाबदार असल्याचे लिहले आहे.

यावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात पत्नी वर्षिता यांच्या तक्रारीवरून साहेबलाल सोहराव शेख व जमीर जहीरौद्दीन शेख यांच्या विरोधात गळफास घेण्यास प्रवर्त केल्यामुळे भारतीय दंड संहिता १९६० नुसार कलम ३०६ व कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे करीत आहेत.

श्रीकांत पोतदार यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, तीने मुले,एक भाऊ,एक बहिण असा परिवार आहे.

From around the web