धोक्याची घंटा : उस्मानाबाद जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी ९६ कोरोना पॉजिटीव्ह , दोन मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज २ ऑगस्ट (सोमवार) रोजी ९६  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच दोन रुग्णाचा मृत्यू झाला. 
 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार १८२  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६१ हजार ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४१९  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९१७  झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५२१ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१६ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.

sd

d

sd

d

s

From around the web