धोक्याची घंटा : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ ऑगस्ट रोजी ९३ कोरोना पॉजिटीव्ह , चार मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९९५
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ४  ऑगस्ट ( बुधवार ) रोजी ९३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४०  रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच चार  रुग्णाचा मृत्यू झाला. 
 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ३८० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६१ हजार ४३९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४२४  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९९५  झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५२२ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१६ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.

d

d

d

d

d

d

From around the web