आदित्य ठाकरे यांनी दिले उस्मानाबादला पाच व्हेंटिलेटर 

 
s

उस्मानाबाद -  पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने उस्मानाबाद व कळंब साठी पाच व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.कळंब उपजिल्हा रुग्णालयात दोन व उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये तीन व्हेंटीलेटर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवसेना पक्षाच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. हे उच्च दर्जाचे पाच व्हेंटिलेटर रुग्णालयांना दिल्याने निश्चितपणे रुग्णांना त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे मत आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्यक्त केले. 

राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यातही या लाटेत ऑक्सीजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. नुसत्या ऑक्सीजनवर नाही तर पुढे जाऊन व्हेंटीलेटरची आवश्यकता भासली आहे.साहजिकच याचा वैद्यकीय यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडू नये म्हणून सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहेच.जिल्ह्यामध्ये ऑक्सीजन प्लँट सूरु झाले असुन सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन जिल्ह्यात देशातला पहिला प्रयोग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सरकारच्या पुढाकाराने यशस्वी झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. याच अनुषंगाने उस्मानाबाद व कळंब येथील शासकीय रुग्णालयामध्ये व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत आहे,बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सेवा व उपचार मिळावे या दृष्टिकोनातून युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने पाच व्हेंटिलेटर देण्यात आले.

जिल्हा रुग्णालयासाठी तीन व कळंब उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन व्हेंटीलेटर दिले असुन शिवसेनेकडुन आलेले हे व्हेंटीलेटर अत्याधुनिक व नामवंत कंपनीचे आहेत.उच्च तंत्रज्ञानाने युक्त व हाताळण्यास अत्यंत सुलभ असलेल्या या आधुनिक व्हेंटीलेटरचा मोठा फायदा दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.  कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयास शुक्रवारी तर शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे हे व्हेंटीलेटर सुपुर्द करण्यात आले आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हेंटीलेटर रुग्णालयात दिल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, डॉ.ईस्माईल मुल्ला आदीची उपस्थिती होती.

From around the web