कोविड केअर सेंटरसाठी दहा ठिकाणच्या इमारती अधिग्रहित 

उस्मानाबाद जिल्ह्यात 1260 बेडची व्यवस्था
 
कोविड केअर सेंटरसाठी दहा ठिकाणच्या इमारती अधिग्रहित

 उस्मानाबाद - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधि‍क वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक. या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दहा ठिकाणच्या इमारती ताब्यात घेऊन तेथे आरोग्य विभागाच्या अधिनस्त “डेडिकेटेड कोविड केअर सेंटर” स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज दिले आहेत.

           पॉलीटेक्नीक मुलांचे वसतीगृह प्रथम वर्ष जुनी बिल्डिंग, मुलींचे वसतीगृह द्वितीय व तृतीय वर्ष नवी बिल्डींग (बेडची संख्या 210), अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, वैराग रोड (बेडची संख्या 100), तुळजापूर येथील 124 भक्त निवास, यात्रा मैदान (बेडची संख्या 300), मुरुम येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा (बेडची संख्या 120), उमरगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज शासकीय मुलांचे वसतिगृह (बेडची संख्या 40), लोहारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह (बेडची संख्या 100), भुम येथील शासकीय मुलांचे वसतिगृह (बेडची संख्या 120), परंडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह (बेडची संख्या 100), कळंब येथील आय.टी.आय. (बेडची संख्या 80), वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे, मुलींचे वसतिगृह (बेडची संख्या 90) अशा एकूण 1260 बेडची व्यवस्था करण्याचे आदेश श्री. दिवेगावकर यांनी दिले आहेत.

From around the web