धोत्रीच्या खून प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

 
Osmanabad police

तामलवाडी  : तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 87 / 2019 या खूनाच्या  गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उप निरीक्षक- . रविकीरण जगताप यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल आज दि. 02 सप्टेंबर रोजी जाहिर होउन यात आरोपी- राजेश दिलीप पवार उर्फ भारत, वय 33 वर्षे, रा. धोत्री, ता. तुळजापूर यास भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल आजन्म कारावासासह 10,000 ₹ दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त 1 महिना सश्रम कारावासासह भा.दं.सं. कलम- 506 च्या उल्लंघनाबद्दल 5,000 ₹ दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त 15 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावन्यात आली आहे. तसेच नमूद दंडातील 10,000 ₹ रक्कम ही या गुन्ह्याच्या प्रथम खबरी श्रीमती- सुनंदा पवार यांस देण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.

 आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद  : लक्ष्मण रंगनाथ डबडे, रा. खानापूर याने गावकरी- निखील करंडे व अविनाश शेळके यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा तगादा त्या दोघांनी लावल्याने कंटाळून लक्ष्मणची आई- गंगाबाई यांनी दि. 29.08.2021 रोजी 21.30 वा. सु. झाडास गळफास घेउन आत्महत्या  केली आहे. अशा मजकुराच्या लक्ष्मण डबडे यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशी दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 सह महाराष्ट्र सावकारी कायदा कलम- 39, 45 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web