नळदुर्गमध्ये दलित महिलेला जातीयवाचक शिवीगाळ करून विनयभंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांचे अभय 

 
crime

नळदुर्ग  - शहरातील इंदिरानगरमधील एका दलित महिलेला जातीयवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या आरोपींना नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी अभय दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांच्याकडे करण्यात आली आहे. 

माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर यांच्या घरी धुणी - भांडी करणाऱ्या महिलेला १० ते १२ जणांच्या टोळक्याने मारहाण करून, जातीयवाचक शिवीगाळ केली तसेच तिचा विनयभंग केला . याप्रकरणी आरोपीच्या नावासह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात  आहे. त्यात किल्ला गेट परिसरात राहणारे अमीर अजगर फकीर, विज्जु वहाब सय्यद, अखलाक अमजद शेख, रोहन राम  शिंदे, मोसीन मुख्तार शेख,असिफ  शहा यांची नावे आहेत. 

पोलिसांनी या आरोपीवर किरकोळ कारवाई केली पण विनयभंग आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ नुसार गुन्हा दाखल केला नाही, अशी महिलेची तक्रार आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना  देखील देण्यात आली आहे. 

नळदुर्गमध्ये एक 'भाई गॅंग ' तयार झाली असून, या गँगने  शहरात  उच्छाद मांडला आहे. गोरगरीब मुलांना मारहाण करणे, किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांना मारहाण करणे, पोलीस मित्र असल्याचे सांगून गाड्या अडवणे, पोलीस स्टेशनमध्ये रील तयार करून पोलिसाना आव्हान देणे, दुचाकी वाहनावर पोलीस लिहून पोलीस टोपी घालून रील तयार करणे असे उद्योग सुरु आहेत. 

नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून सिद्धेश्वर गोरे जॉईन झाल्यापासून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून, पोलीस अवैध धंद्याच्या वसुलीत गुंतल्याने गुंडगिरी, दहशत माजवणाऱ्याचे चांगलेच फावले आहे. 

From around the web