बोरखेडा येथील वारकर्याचा अपघाती मृत्यू
पाडोळी - उस्मानाबाद तालुक्यातील बोरखेडा येथील बालाजी बळीराम गुंड ( वय 44) यांचे औसा लातूर या मार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
संप्रदायीक वारकरी बालाजी गुंड हे आज दुपारी 2 च्या सुमारास औसा कडून लातूर कडे जात असताना कारंजे खडी केंद्रानजीक मागून येणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीवर असणारे बालाजी गुंड जागीच मरण पावले तर सोबत असणारे गावातील मोतीराम बाबू जाधव हे गंभीर रित्या जखमी झाले असून,त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.
बोरखेडा येथील शांत संयमी व वारकरी संप्रदायातील वारकरी असणारे बालाजी हे मृदंग, टाळ आणण्यासाठी लातूर कडे जात होते.मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बोरखेडा येथील सरपंच भाऊसाहेब गुंड यांचे ते बंधू असून त्यांच्या पश्चात दोन भाऊ,तीन बहिणी पत्नी, आई, दोन मुली, असा परिवार असून गावातील एक गोर गरीबांचा कैवारी, वारकरी, व एक सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची खंत बोरखेडा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून बोरखेडा गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.