मार्केट कमिटीचे सभापती अरुण वीर यांचा अपघाती मृत्यू 

 
मार्केट कमिटीचे सभापती अरुण वीर यांचा अपघाती मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण ( पापा  ) वीर यांचा आळणी पाटीजवळ अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रकट केला आहे. 

रविवारी सायंकाळी अरुण ( पापा  ) वीर हे आपल्या दुचाकीवरून उस्मानाबादहून आपल्या गावाकडे जात असताना, आळणी पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची  धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

 अरुण ( पापा  ) वीर हे उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती असून, आळणी गावचे अनेक वर्षे उपसरपंच होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले अरुण वीर हे 'पापा'  हे टोपण नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आळणी गावावर शोककळा पसरली आहे. 

अरुण ( पापा  ) वीर यांच्या पश्चात वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. वीर यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रगट  केला आहे. 

From around the web