उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस 11 लसीकरण केंद्रांवर उपलब्ध
उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या बातमीनंतर आरोग्य विभागाला चांगलाच डोस मिळाला आहे. त्यानंतर जिल्ह्यामध्ये दिनांक 12 मे आणि 13 मे 2021 रोजी 11 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
ही लसीकरण केंद्रे आहेत.
- जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद,
- उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, कळंब, परांडा,
- उपजिल्हा रुग्णालय उमरगा अंतर्गत चिंचोळी हॉस्पिटल
- उमरगा, ग्रामीण रुग्णालय मुरूम, सास्तूर, लोहारा, तेर, वाशी आणि भूम.
ज्या लाभार्थ्यांचा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस पूर्ण झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना या लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑनस्पाॅट पद्धतीने त्यांचे व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लस देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.
लसीकरणाला जातेवेळी लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि पहिला डोस घेतला त्यावेळेसचे नोंदवलेले ओळखपत्र, तसेच प्रमाणपत्र अथवा मोबाईलवर प्राप्त झालेला मेसेज लसीकरण केंद्रांवर प्रक्रिया सुलभ होणे करिता सोबत बाळगावे.
या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी या केंद्रांवर गर्दी करू नये. तसेच लस घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि शिस्तीचे व शांततेचे पालन करत लस घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
12 मे 2021 रोजी चे कोविड लसीकरण केंद्र
केवळ कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीचे लसीकरण केंद्रे - जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, कळंब, परांडा, ग्रामीण रुग्णालय लोहारा, वाशी, भूम, तेर, सास्तूर व मुरूम आणि चिंचोळी हॉस्पिटल उमरगा (उप. जि. रू. उमरगा अंतर्गत मोफत)
आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर आणि 45 वर्षावरील नागरिक यांच्यासाठी कोविशिल्ड लसीकरण केंद्र ठिकाणे
( सकाळी 9 ते दु.12 वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य आणि दु. 12 नंतर पहिला व दुसरा दोन्ही डोस करिता) -
- शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद,
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खिरणी मळा आणि शाहू नगर उस्मानाबाद,
- पोलीस रुग्णालय उस्मानाबाद,
- सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि निवडक 19 आरोग्य उपकेंद्र