उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन  केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मिळणार 

 
S

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दि.३ जून रोजी निवडक ३ आरोग्य केंद्रावर दुसरा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय या लसीकरण केंद्रावर १ हजार २० जणांना लस दिली जाणार आहे. 

लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक असून या दिवशी केवळ ४५ वर्ष वयाच्यापुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

सदरील लसीकरण ग्रामीण रुग्णालय सास्तूर (१४०), उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर (४८०) व उपजिल्हा रुग्णालय कळंब (४००)  या ३ केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. 

ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा असे ‌दोन्ही डोस दिले जाणार आहेत. अशा ठिकाणी दोन्ही लसींच्या लाभार्थ्यासाठी स्वतंत्र नोंदणी व रांगा ठेवण्यात येणार आहेत. तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस द्यावी, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web