कळंबच्या महिला नगराध्यक्षांना अश्लील  शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल 

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेसबुक लाइव्ह करून केली शिवीगाळ 
 
s

कळंब : कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्ण सागर मुंडे यांना अश्लील  शिवीगाळ केल्याप्रकरणी  नगरसेविका मीरा चोंदे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चोंदे असे शिवीगाळ केलेल्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभं राहून आकाश चोंदे याने फेसबुक लाइव्ह करून सुवर्णा मुंडे यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य करत शिवीगाळ केल्याची तक्रार स्वतः नगराध्यक्षा यांनी कळंब पोलिसात दिली आहे. नगराध्यक्षा यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 अ, 153 अ, 294, 504 व आयटी ऍक्ट 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांची पोलिसांत  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,  मी सुवर्णा सागर मुंडे कळंब नगर परिषद ची अध्यक्षा असून व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका आहे. माझी शाळेतील पार्श्वभूमी पहाल तर मी एक सरळमार्गी व सचोटीने कार्य करणारी शिक्षीका आहे. 

     गतवर्षी काही कामाच्या मजूर फेडरेशन साठी शिफारशी तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन तीन शिफारशी आम्हाला द्या म्हणून नगरसेविका सौ. मिरा चोंदे यांचा मुलगा आकाश चोंदे याने आम्हा पती पत्नी कडे वारंवार मागणी केली. परंतू पालीकेच्या स्वनिधीतील तूट पाहता तात्कालीन मुख्याधीकारी यांनी सदर कंत्राटाच्या शिफारशी स्थगित ठेवल्या परीणामी ते काम होऊ शकले नाही. 

याचा राग व राजकीय द्वेषातून मिळणारी फूस म्हणून आकाश चोंदे यांनी दिनांक 23 मे च्या मध्यरात्रीनंतर  छत्रपती शिवाजीमहाराज चौकात महाराजाच्या पुतळ्यासमोर उभे राहून एक विडीयो चित्रीत करून स्वतःच्या फेसबुक वर फेसबुक लाईव्ह मध्ये टाकला. नंतर त्याने तो विडीयो भरपूर बदनामी करून डिलीट केला.सदर विडिओ मध्ये आकाश चोंदे याने महाराष्ट्रातील आमदाराबद्दल अपशब्द काढले  तसेच संभाजी ब्रिगेड चे अतुल गायकवाड व उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांजबद्दलही अपशब्द वापरले.तसेच जातीय निर्भत्सना करीत अत्यंत अश्लाघ्य व अश्लील भाषेत माझ्या नावाने शिवीगाळ केली. तसेच रोडच्या कामात गडकरीसाहेबाच्या खात्याकडून मी पैसे खाल्ले असेही आरोप केले.

      एका स्त्री पदाधीका-याची अश्लील निर्भत्सना करीत विनयभंग करणे, जातीय तेढ निर्माण करणे, पैसे खाण्याचा खोटा आरोप करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, व राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्यासमोर बिभत्स वर्तन करून छत्रपती शिवाजीमहाराज या राष्ट्रपुरूषाचा अपमान करणे असे अनेक गुन्हे एकाचवेळेस या गावगुंडाने केलेले आहे. या अनुषंगानेच मी पोलीस अधीक्षक यांना भेटून सविस्तर चर्चा केली व कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भादवी च्या 354 अ, 153अ, 294, 504 व आयटी ऐक्ट 66 नुसार काल रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. व सोबत सदर विडीयोची क्लीप ही सादर केली आहे.


    सदर विषयावर लवकरच आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना व महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा  रेखा शर्मा व महाराष्ट्र च्या प्रभारी  यशोमती ठाकुर यांना भेटून सदर गावगुंडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार आहे.,असेही मुंडे यांनी सांगितले. 

From around the web