श्री सिध्दीविनायक परिवारातर्फे सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

 
d

उस्मानाबाद - जिह्यातील सहकार क्षेत्रात नावारुपास आलेल्या श्री सिध्दीविनायक परिवारातर्फे जिह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस कर्मचाऱ्यांचा उर्स्फुत प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एक विश्वसनीय संस्था म्हणून श्री सिध्दीविनायक परिवाराकडे पाहिले जाते. या परिवाराच्या वतीने जिह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शिवानंद फक्शन हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा येथील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध मार्गदर्शक संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सहकार क्षेत्रातील विविध विषय, कार्यालयीन आचार संहिता व कार्य प्रणाली, व्यवसाय वाढीसाठी उपाय योजना, मार्केटिंग व ग्राहक संबंध, व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्ये यासह इतर विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या विविध सहकारी संस्था चांगले काम करत आहेत. सहकाराच्या माध्यमातून जिह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. श्री सिध्दीविनायक परिवारानेही आपल्या कामामुळे सामान्य लोकांचा विश्वास संपादन केला आहे. यापुढील काळातही सहकार क्षेत्रात संस्था अशीच उत्तम कामगिरी करीत राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, विधीज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड.नितीन भोसले, मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, यशदा मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गरड, जिल्हा पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोरे व  सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे सर्व विभाग प्रमुख, शाखाधिकारी तसेच सर्व शाखांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर संस्थातील कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

From around the web