वाईन विक्री :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना निर्णय मागे घेण्यासाठी पोस्ट कार्ड 

 
d

उस्मानाबाद  - महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे त्याचा भाजपा महिला मोर्चा उस्मानाबादच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन महाराष्ट्र शासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वाईन विक्रीचा निर्णय त्वरीत थांबवावा यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले. 

 महाविकास आघाडीच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे तरुण पीढी व्यसनाधीनकडे जास्त वळुन महाराष्ट्रातील माय माऊल्यांच्या कुटुंबाचे खुप मोठे नुकसान होईल. होणाऱ्या या गंभीर परिणामांचा विचार करुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याची नोंद घेवून आमचा विरोध नोंदवावा असे या पत्रात म्हटले आहे.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, अर्चनाताई अंबुरे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट ज्योती वाघे, जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने, सिंधु जाधव तर जिल्हा सरचिटणीस वर्षा पाटील, लतिका पेठे आणि ओबीसीसेल उस्मानाबाद महिला मोर्चा तालुकाध्यक्ष साखर कांबळे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

From around the web