कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार उस्मानाबादचे वाहनचालक प्रतीक परितेकर

 
s

उस्मानाबाद :  'कोण होणार करोडपती'च्या मंचावर विविध स्तरांतील स्पर्धक सहभागी होत असतात. कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर तर कोणी गृहिणी. प्रत्येक व्यक्ती या मंचावर येऊन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करते. करोड रुपये नाही मिळाले, तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवांतून, संघर्षांतून अनेक चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना शिकायला मिळतात. येत्या आठवड्यात गुरुवारी ७ जुलै रोजी असेच उस्मानाबादचे वाहनचालक प्रतीक परितेकर हे स्पर्धक कोण होणार करोडपती'च्या मंचावर स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.

लहानपणी हलाखीची परिस्थिती असल्याने सातवीत असतानाच प्रतीक यांनी बाहेर नोकरी करायला सुरुवात केली. त्यांनी हॉटेल, गॅरेज,वेल्डर, टर्नर, एमआयडीसी, दुकान, बिअर बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली आहेत. बारावी पास झाल्यानंतर त्यांनी चालक परवाना काढला आणि वाहनचालक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचे मालक त्यांच्यावरपालकांसारखं प्रेम करतात. 

त्यांच्याकडे कामाला जाताना प्रतीक ह्यांना कधीच वाटत नाही की, आपण कामावर जातो आहोत, आपण आपल्या दुसऱ्या घरी जातो असंच वाटतं. प्रतीक ह्यांना टीव्ही बघण्याची खूप आवड आहे, पण त्यांच्याकडे टीव्ही नव्हता. वाहनचालकाची नोकरी लागल्यावर त्यांच्या पहिल्या पगारात त्यांनी टीव्ही विकत घेतला होता. आणि आता या 'कोण होणार करोडपती'च्या मंचामुळे स्वतः टीव्हीवर येणार असल्याने ते खूप खूश झाले आहेत. प्रतीक ह्यांना त्यांच्या परिवाराला घेऊन एकदा फाइव्ह स्टार हॉटेलमध्येराहायचं आहे.

'कोण होणार करोडपती'मध्ये पैसे जिंकून त्यांना स्वतःचं घर बांधायचं आहे. त्यांचं अजून एक स्वप्न आहे की त्यांना आपल्या परिवारासोबत फिरायला जायचं आहे. प्रतीक यांच्या या सगळ्या इच्छा 'कोणहोणार करोडपती'च्या मंचावर पूर्ण होतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती गुरुवार ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
 

From around the web