वाशी : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

वाशी  : गौण खनिजाची अवैध वाहतुक होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन वाशी महसुल विभागाच्या पथकाने दि. 15.02.2022 रोजी 16.00 वा. सु. वाशी येथील शिवशक्ती साखर कारखान्याजवळ सापळा लावला होता. यावेळी वाशी ग्रामस्थ- मंगेश विलास जगताप उर्फ निवांत हे अर्जुन  555 या परिवहन नोंदणी क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टर- ट्रेलरमधून वाळु वाहुन नेत असतांना आढळले. 

यावर पथकाने त्यांना हटकून कारवाई कामी वाळुसह ट्रॅक्टर- ट्रेलर तहसील कार्यालय, वाशी येथे नेण्यास ताब्यात घेतला. यावर मंगेश जगताप यांसह अन्य 12 पुरुषांनी बेकायदेशीर जमाव जमवून पथकास शिवीगाळ, दमदाटी करुन धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टरमधील वाळू तेथेच ओतून ट्रॅक्टर- ट्रेलर घेउन पसार झाले. यावरुन मंडळ अधिकारी- दत्तात्रय प्रेमनाथ गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 188  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी  : तामलवाडी, ता. तुळजापूर येथील संतोष भाउराव घोटकर यांनी दि. 15.02.2022 रोजी 17.00 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथील महामार्गावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 3925 ही मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोकॉ- सुरज नरवडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web