स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 
tiranga

उस्मानाबाद -  आजादी का अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरात दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.याबाबत पूर्वतयारी बैठकीत आज सविस्तर चर्चा झाली.

जिल्ह्यात व शहरात प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यात  विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावेत अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आज येथे दिल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात  घरोघरी तिरंगा अभियानाच्या पूर्वतयारी निमित्त आयोजित शिक्षण संस्थांच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी श्री.स्वामी बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अविनाश कोरडे,तहसीलदार गणेश माळी,जिल्हा शिक्षण अधिकारी(मा) गजानन सुसर ,जिल्हा शिक्षण अधिकारी श्री.मोहरे आणि शहरातील सर्व शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने दि.13 ऑग्स्ट रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.शहरातील सर्व शाळातील आठवी ते बारावीचे 1500 ते 2000 विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी होतील. शहरातील प्रत्येक शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेचा गणवेश आणि शिक्षक व कर्मचारी पांढ-या रंगाचे वस्त्र परिधान करून आणि घोषवाक्य असलेले बॅनर घेऊन यात सहभागी व्हावे, असेही आवाहन श्री.स्वामी यांनी केले आहे.

यावेळी  जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभात फेरीत सहभागी असणा-या विद्यार्थ्यांसाठी चहा, फराळ आणि पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या प्रभात फेरीत एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट कॅडेट यांचे संचलनही होणार आहे. त्यामुळे याबाबत सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी आणि रिहर्सल करून घ्यावी. प्रभात फेरीच्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रणाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही श्री.स्वामी म्हणाले.

13 ऑगस्ट रोजीची प्रभात फेरी सकाळी 8 वा. जिल्हा स्टेडियमपासून सुरू होऊन समता कॉलोनी मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलय ते शिवाजी चौक ते आंबेडकर चौक तसेच जिल्हा स्टेडियम अशी असणार आहे.

From around the web