कोविड पासून संरक्षणासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 
divegav

  उस्मानाबाद - ग्रामीण  व शहरी भागात आवश्यकतेनुसार लसीकरणाचे आयोजन आणि नियोजन करावे . शाळा ,  महाविद्यालयामधील 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांचे समुपदेशन करावे .  विद्यार्थ्यांच्याजास्तीत जास्त  लसीकरणासाठी त्यांना प्रेरित करून लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाहधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकतेच दिले.       

 कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण जिल्हा समन्वय समितीच्या  बैठकीत श्री .दिवेगावकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,जिल्हा शल्यचिकित्सक यांचे  प्रतिनिधी डॉ.सचिन बोडके,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के.के,मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हलकुडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.चौगुले आणि आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर म्हणाले की, बचत गट, शिक्षक, वकील,व्यापारी इत्यादीसाठी स्वतंत्र लसीरकरण सत्राचे आयोजन करण्यात यावे आणि धर्मगुरूंच्या बैठका आयोजित करून त्यांच्या सहाय्याने लसीकरण वाढवण्याचे प्रयत्न करावेत.महिलांना आणि गरोदर मातांना लसीकरणाचे फायदे सांगावेत. लसीकरणबाबत त्यांच्या मनात असणारे  गैरसमज दूर करण्यासाठी महिला व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या  माहितीपर व्हिडीओ क्लिप तयार करून प्रसारित करावेत.यापुढे कोविड या महामारीपासून संरक्षणासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लॉकडाऊन टाळावयाचे असल्यास ज्यांनी आद्यप डोस घेतला नाही त्यांना  आणि दुसरा डोस देय असणाऱ्या सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे.असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिले. 

From around the web