उस्मानाबाद शहरातील मशिदीवरील अनाधिकृत भोंगे तात्काळ बंद करा अन्यथा हनुमान चालिसाने प्रत्युत्तर देणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
 
s

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील मशिदींवर लावण्यात आलेले अनाधिकृत भोंगे तात्काळ बंद करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. अनाधिकृत भोंगे बंद न झाल्यास अशा मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसा वाजविण्यात येईल, असा इशारा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज (दि.8) याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद शहर, तालुका व  जिल्ह्यामध्ये मशिदींवर अनाधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन हे अनाधिकृत भोंगे तात्काळ बंद करावेत. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपेण गोहत्या व गोमांस विक्री होत आहे. त्यावरही तात्काळ कारवाई करण्यात यावी. याबाबत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करील. तसेच अनाधिकृत भोंगे वाजवणार्‍या मशिदींसमोर भोंगा लावून हनुमान चालिसा वाजविण्यात येईल. अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, तालुका सचिव शिवानंद ढोरमारे, शहर उपाध्यक्ष सुधीर शिंगाडे, वाशी तालुका उपाध्यक्ष विक्रम गपाट, भीमनगर शाखाध्यक्ष बलभीम बनसोडे यांची स्वाक्षरी आहे.

From around the web