श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ७ ते १० ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

 
news

   उस्मानाबाद -  श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि. 26 सप्टेंबर 2022 ते दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरा होत आहे. दि.09 ऑक्टोबर 2022 रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी मंदिर पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून लोखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात. या नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर आणि परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या करीता भाविक पायी चालत येणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

दि. 07 ऑक्टोबर 2022 रोजीचे 00:01 ते दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीच्या 24:00 वा. दरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास ( Light & Heavy Vehicles ) मनाई करण्यात येत आहे. उस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, हैद्राबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. हैद्राबाद ते औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

औरंगाबाद ते हैद्राबादकडे येणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. उस्मानाबाद ते सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास उस्मानाबाद, तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते उस्मानाबादकडे येणारी वाहतूकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. लातूर ते सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास लातूर, औसा, तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते लातूरकडे येणारी वाहतूकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर, औसा, लातूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

औरंगाबाद ते सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास येरमाळा, उस्मानाबाद, तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते औरंगाबादकडे येणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. तुळजापूर ते सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते तुळजापूरकडे येणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.  तुळजपूर 'ते बार्शीकडे जाणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, ढेकरी, गोडगाव, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते तुळजापूरकडे येणाऱ्या वाहतूकीस पथक्रमण करण्यास बार्शी, गोडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील

उस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणारी वाहतूक हैद्राबाद, उमरागा, औसा मार्गे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते औरंगाबादकडे जाणारी वाहतूक उमरगा, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा, बीड मार्गे औरंगाबादकडे पथक्रमण करतील. औसा, औरंगाबाद ते हैद्राबादकडे येणारी वाहतूक औरंगाबाद, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाई, लातूर, उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील. उस्मानाबाद ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक वैराग मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते उस्मानाबाद कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील. लातूर ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते लातूरकडे येणारी वाहतूक सोलापूर, बार्शी, येडशी, ढोकी, मुरुड, लातूर या मार्गे पथक्रमण करतील.

औरंगाबाद ते सोलापूरकडे जाणारी वाहतुक येरमाळा, बार्शी, सोलापूर, या मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते औरंगाबादकडे येणारी वाहतूक सोलापूर, बार्शी, येरमाळा या मार्गे पथक्रमण करतील. तुळजापूर ते सोलापूरकडे जाणारी वाहतुक, मंगरुळ पाटी, इटकळ, बोरामणी, सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक सोलापूर, बोरामणी, इटकळ, मंगरुळ पाटी, तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील. तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतूक तुळजापूर, उस्मानाबाद, वैराग, बार्शी या मार्गे पथक्रमण करतील. बार्शी ते तुळजापूरकडे येणारी वाहतूक बार्शी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे पथक्रमण करतील. वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाही.

दि. 07 ऑक्टोबर 2022 रोजीचे 00:01 वा ते दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीचे 24:00 वा दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारचे वाहतुकस बंद असेल. असे जिल्हाधिकारी तथा मंदिर प्रशासन दंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से.) आणि पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

From around the web