कळंब तालुक्यातील साखर घोटाळा प्रकरणी आणखी तीन आरोपीना अटक 

 
s

कळंब  - तालुक्यातील हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याने  परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयाच्या साखर घोटाळा प्रकरणी  आणखी 3 आरोपींना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपत साबळे, रोहिदास घोडके, नीलेश देशपांडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


उस्मानाबाद कळंब तालुक्यात असणाऱ्या सावरगाव येथील शंभू महादेव सहकारी साखर कारखान्याची, 46 कोटी रुपयांची 1 लाख 54 हजार 177 क्विंटल साखर वैद्यनाथ बँकेकडे कर्जापोटी तारण म्हणून ठेवण्यात आली होती. ही सर्व साखर वैद्यनाथ बँकेच्या ताब्यामध्ये असताना, 2017 - 18 मध्ये चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते.

याप्रकरणी शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह वैद्यनाथ बँक संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा 40 जणांविरुद्ध, 12 मार्च 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात यापूर्वी दिलीप आपेट यांच्यासह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक ही करण्यात आली आहे. तर काल 24 मार्च रोजी पुन्हा 3 जणांना अटक केली आहे.अटकेत संपत साबळे, रोहिदास घोडके, या 2 वैद्यनाथ बँकेच्या कर्मचाऱ्यासह नीलेश देशपांडे या अंबाजोगाईच्या दीनदयाळ बँक शाखेच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर याअगोदर या प्रकरणात 6 आरोपींना अटक झालेली आहे. दरम्यान या तिघांचीही कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


काय आहे प्रकरण ? 

कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभु महादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याची स्थापना 2000 मध्ये झाली असून कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट आहेत. शंभु महादेव शुगर अन्ड अलाईट इंडस्ट्रीज लि. हावरगाव या कारखान्यासाठी चेअरमन दिलीपराव आपेट व कारखान्यांचे संचालक मंडळांनी या कारखान्यासाठी 2002 पासून 2017 या कालावधीमध्ये वेळोवेळी तोडणी, वाहतूक, यंत्रणा उभारणीसाठी, शेतकऱ्यांना ऊसबील देण्यासाठी साखर कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर साखर तारण व कारखाणा मॉडगेज करून 46 कोटी 23 लाख रूपये कर्ज घेतले. हे कर्ज वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक, परळी, नागरी सहकारी बँक लि. नागपूर, द्वारकादासमंत्री नागरी सह. बँक बीड, सोलापूर जनता अर्बन बँक सोलापूर, नगर अर्बन को-ऑप बँक नगर, नांदूरा अर्बन को-आप बँक लि. नांदूरा, वर्धा नागरी सहकारी बँक लि. वर्धा, भाग्यलक्ष्मी महिला सह. बँक लि. नांदेड, जनसेवा सह बँक लि. हडपसर पुणे, जनकल्याण अर्बन को आप बँक लि. कळंब, दिनदयाळ अर्बन को-आप बँक लि अंबाजोगाई, जनसेवा सह बँक लि. बोरिवली लि., जनता सहकारी बँक लि. वसई, अकोला जनता कम. को-आप बँक लि. अकोला., स्टेट बँक आफ हैद्राबाद, शाखा कळंब, डोंबिवली नागरी सह. बँक लि. डोंबिवली, जळगाव जनता सह बँक लि. जळगाव, जनता सह बँक लि. पुणे, खामगाव अर्बन को-आप बँक लि. खामगाव या बँकांकडून सदरची रक्कम जमा करून वैयक्तीक जिम्मेदारीवर हावरगाव येथील शंभु महादेव कारखान्याला दिले होते. कर्ज हे कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर व कारखान्याच्या व इतर स्थावर मालमत्तेवर गहाणखताद्वारे देण्यात आले होते.

कर्ज देताना दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन व शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांनी साखर कारखान्यामध्ये 2017 मध्ये शंभु महादेव साखर कारखाना हावरगाव येथील साखरेच्या गोडाउनमध्ये 154177 एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणुन साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखर साठय़ाच्या गोडाउनला दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेने स्वत:चे मालकीचे कुलपे लावून सील केले होते. तसेच या साखर साठय़ावर नियंत्रक म्हणुन स्थानिक बँक अधिकारी म्हणुन नियुक्त केले होते. तारण साखर साठय़ाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. तारण साखर साठा खुल्या बाजारात विक्री करण्याचे बँक व साखर कारखाना यांच्यातील करारामध्ये ठरले होते. शंभु महादेव कारखान्यास ज्यावेळेस साखर टेंडरद्वारे (जाहिर निवीदा काढून ) विक्री करावयाची आहे. त्या-त्या वेळी कारखाना जेवढा साखर साठा विक्री करावयाचा आहे. तेवढया साखरेच्या रक्कमेचा भरणा वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य कार्यालय परळी येथे किंवा दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. शाखा केज येथे या बँकेस करत होते. त्यानंतर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखी आदेशाने भरणा केल्यानंतर भरणा केलेल्या रक्कमेइतका साखर साठा शंभु महादेव साखर कारखाना यांच्या मार्फतीने खरेदीदारास दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळीचा शंभु महादेव साखर कारखाना हावरगांव येथे नियुक्त केलेला स्थानिक बँक अधिकारी मार्फतीने देण्यात येत होता.

From around the web