उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  :  सुरेश हरीदास कवडे रा.पारा रोड वाशी हे दिनांक 23 मार्च रोजी 9.30 वा ते व त्यांचा भाउ योगेश कवडे यांची गावकरी दिंगबर कवडे व सहा भाउबंध यांनी  वाट आडवुन मागील भांडणाची कुरापत काढुन कोयत्याने, पाठीवर-मांडीवर तर रॉडने डोक्यात पाठीवर मारुन जखमी करुन सुरेश कवडे  यांचे गळयातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे लॉकीट  व रोख रक्क्म 12 00 हजार रुपये असे बळजबरीने काढुन घेतले व सुरेश यांची आई व भाउ यांना लाथा बुकयांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली  सुरेश कवडे यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम143,147,148,149,341,324,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

 परंडा : ईटा येथील आशाबाई काळे या दिनांक 24 मार्च रोजी रात्री 02.00 वा घरात झोपलेल्या असतांना त्यांच्या मद्यधुंद पतीने आशाबाई यांच्या अंगावर ॲसीड फेकल्याने त्यांच्या पाठीला, हाताला, छातीवर भाजुन जखमा झाल्या. अशा मजकुराच्या आशाबाई यांनी वैद्यकिय उपचार दरम्यान  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 326 अ अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

येरमाळा  : वडजी येथील प्रवीण जुगधर हे  व रामभाउ अर्जुन घुले हे दिनांक 25 मार्च रोजी 08.30 वा प्रतिक कलेक्शन समोर बसले असता  गावकरी संदीप थोरात याने जुना वाद उकरुन काढुन प्रविण जुगधर यांच्या गळयाला सत्तुर लावुन, धाक दाखवुन प्रविण यांना शिवीगाळ केली. हा सत्तुर प्रविण यांच्या गळयास टोचुन जखम होवुन रक्त्‍ वाहिल्याने त्याचा जाब प्रविण यांनी थोरात यास विचारला असता थोरात याने प्रविण यांच्या डोक्यात सत्तुर मारला असता तो वार प्रविण यांनी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोटास व डाव्या कानाच्या पाळीस सत्तुरचा वार लागुन दुखापत झाली. अशा मजकुराच्या प्रविण जुगधर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 307,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

From around the web