उस्मानाबादच्या समर्थनगरमधील जलकुंभ धोकादायक 

छताखालील इमारतीला तडे तर जलकुंभचा एक कॉलम तुटला 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर परिषदेने अमृत अभियान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना सन 2019  - 20 मध्ये  समर्थ नगरमध्ये बांधलेल्या जलकुंभच्या  छताखालील इमारत तसेच जलकुंभ चा एक कॉलम तुटल्याने हा जलकुंभ धोकादायक झाल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद नगरपरिषदेने सन 2019 - 20 मध्ये अमृत अभियान योजनेअंतर्गत उस्मानाबाद  पाणीपुरवठा योजनेमध्ये समर्थनगर मधील जुना जलकुंभ पाडून नवीन जलकुंभ  उभारण्याचे काम एस. डी.  लहाने (लातूर )  या ठेकेदारास दिले असता सदर ठेकेदाराने प्रथमत:  नवीन जलकुंभ उभा केला व सदर  जलकुंभचे काम पूर्ण झाल्याने पूर्वीचा जुना जलकुंभ पाडत असताना कुठलीही दक्षता न घेतल्याने सदरचा जुना जलकुंभ नवीन जलकुंभ च्या छताखालील इमारतीवरती व कॉलमवरती कोसळल्याने नवीन जलकुंभचा एक कॉलम पूर्णतः तुटून छताखालील इमारत कोसळली असल्याने शासनाचे अतोनात नुकसान झाले आहे या गैरप्रकारास ठेकेदारबरोबर उस्मानाबाद नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हरीकल्याण  यलगट्टे हे देखील तितकेच जबाबदार आहेत.

जुना जलकुंभ नवीन जलकुंभच्या छताखालील इमारतीवरती व कॉलम वरती कोसळल्याने नवीन जलकुंभला मोठा हादरा बसून तो पूर्णतः कमकुवत झाला असल्याने भविष्यात  जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,  तेव्हा या प्रकरणाची व नवीन जलकुंभच्या गुणवत्तेची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी प्रस्तावित करून शासनाचे झालेले नुकसान भरून काढावे , अशी मागणी ही सुभेदार यांनी केली आहे.

d

From around the web