औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन
 
matdar

उस्मानाबाद -  भारत निवडणूक आयोग  आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि.01 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. या मतदार संघासाठी विहित नमुन्यात नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे .    

या कार्यक्रमाचे टप्‍पे असे  आहेत- जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दि.01 ऑक्टोबर 2022 आहे. वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनर्प्रसिध्दी दि.15 ऑक्टोबर 2022, वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पनर्प्रसिध्दी दि.25 ऑक्टोबर 2022, नमुना 19 द्वारे दावे आणि हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि.07 नोव्हेंबर 2022 आहे .  हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.19 नोव्हेंबर 2022, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.23 नोव्हेंबर 2022, दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी  दि.23 नोव्हेंबर ते 09 डिसेंबर 2022, दावे आणि हरकती निकाली काढण्याचा दिनांक तसेच पुरवणी यादी तयार करणे दि.25 डिसेंबर 2022 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.30 डिसेंबर 2022 असे या मतदार यादी नव्याने तयार करण्याचे टप्पे आहेत.

                तसेच नमुना क्र. 19 अर्जात अधार क्रमांकासाठी रकाना उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. तथापि ,आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्‍यां वतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दि.01 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानुसार पात्र शिक्षक यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करणे या कार्यक्रमांतर्गत वरील वेळापत्रकानुसार मतदार नोंदणीसंदर्भात वरीलप्रमाणे विहित कालावधीत नमुना-19 अर्ज भरून (आवश्यक कागदपत्रासह) आपले नाव शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

From around the web