वडगावमध्ये फडकला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज

 
d

उस्मानाबाद : अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे औचित्य साधून अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे,पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून व सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,प्रकाश मोरे,पोपट मोरे,सुदर्शन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगव्या भव्यदिव्य ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.


या ध्वजाचे ध्वजारोहण खासदार ओमदादा राजेनिंबाळकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील व उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ गुरव,युवासेनेचे रवी वाघमारे,बाळासाहेब काकडे,माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे,माजी उपसभापती बालाजी गुंजाळ (भूम),देवळालीचे सरपंच समाधान सातव,हनुमंत देवकते,सहायक अभियंता मगर,गडचिरोलीचे तहसिलदार सोमनाथ माळी,छत्रपती संभाजी महाराज समितेचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,पोपट मोरे,प्रकाश मोरे,जयराम मोरे,सुदर्शन मोरे,आबासाहेब मोरे,चंद्रकांत मोरे,रंजीत मोरे,हनुमंत मोरे,आण्णासाहेब पांढरे,विश्वजीत गुरव,प्रमोद चादरे,आण्णा मोरे,योगेश ताटे,सुधिर वाडकर उपस्थित होते.उपस्थित होते.

k

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त वडगाव (सि.) येथे ६२ शिवभक्ताचे रक्तदान

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वडगाव गावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुळे,लक्ष्मीकांत हजारे,सुनिल पांढरे,सुरेश जानराव यांच्या हस्ते करुन उपस्थित रक्तदात्याना अल्पोपहार म्हणून केळी,बिस्कीट,चहा देण्यात आला.यावेळी रक्तसंकलन करण्यासाठी सह्याद्री रक्तपेढी उस्मानाबाद यांच्याकडून रक्तदानाचे संकलन करुन गावातील तरुण युवकांनी व ग्रामस्थांनी भरपुर प्रमाणात प्रतिसाद देत ६२ शिवभक्तानी रक्तदान केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी धीरज मोरे,सुनील पांढरे,ओमकार माळी,आशृबा हजारे,ओमकार मुळे,सोमनाथ कांबळे,सुरज वाडकर,गणेश मंगरुळे,शिवाजी कानडे,सुधीर वाडकर,अभिजीत मोरे,महेश मोरे,अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब वडगाव सी चे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.  
 

From around the web