अजब सरकारचा गजब कारभार .... तीन वर्षानंतर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे निलंबित 

 
s

उस्मानाबाद - नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपालिकेत तीन वर्षांपूर्वी झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारला तीन वर्षानंतर जाग आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बीडचे आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने येलगट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपालिकेत तीन वर्षांपूर्वी आरोग्य आणि स्वच्छता विभागात मोठा भ्रष्ट्राचार  झाला होता. याप्रकरणी भोकर नगरपालिकेचे तत्कालीन हरीकल्याण येलगट्टे  यांना २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक झाली होती. २७ ते २९ नोव्हेंबर २०१९ हे तीन दिवस पोलीस कस्टडीत होते. 

राज्य सरकारने त्यांना त्याचवेळी निलंबित करणे अपेक्षित होते, परंतु त्यांची तेथून बीड जिल्ह्यातील माजलगावला  बदली झाली आणि  माजलगावहून उस्मानाबादला बदली झाली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडी काळात त्यांना जणू काही पदोन्नती मिळाली होती.. त्यांना 'ब' वरून 'अ' नगरपालिका मिळाली. उस्मानाबादची तीन वर्षाची कारकीर्दही त्यांची वादग्रस्त ठरली असून,त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले आहेत.

 मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे  यांच्याविरुद्ध बीडचे आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत अनेक तारांकित प्रश्न उपस्थित केले होते,.अखेर  येलगट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

d

d

From around the web