तानाजी सावंत यांचे उस्मानाबादेतील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले 

 
s

उस्मानाबाद - शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे उस्मानाबादेतील कार्यालय शिवसैनिकांनी फोडून निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, सावंत यांचे पुण्यातील कार्यालयही शिवसैनिकांनी फोडले आहे. 

शिवसेनेसोबत गद्दारी करुन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या सावंतांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.  गद्दारांना यापुढे माफी नाही. ज्या शिवसेनेने यांना मोठे केले त्या शिवसेनेशीच गद्दारी करणारे आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला. 

dx

यावेळी  शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मुंडे, न.प. गटनेते सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, बंडू आदरकर, सुरेश गवळी, पंकज पाटील, विजय राठोड, पांडू भोसले, दीपक जाधव, अभिजित देशमुख, प्रवीण केसकर, मुजीब काझी, जगदीश शिंदे, सरफराज मोमीन, अजित बाकले, साजीद, संकेत सूर्यवंशी, शिवप्रताप कोळी, गणेश आसलेकर, अरबाज शेख, कलीम कुरेशी, महेश लिमये, अक्षय नाईकवाडी, मनोज केजकर, सुनील आंबेकर यांच्यासह शहर शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

पुण्यातील कार्यालय फोडले 

पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. “ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

 आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल.माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं...

d

- आ.तानाजी सावंत

From around the web