सातारा सैनिकी शाळेच्या अभ्यास गटाची तुळजाभवानी सैनिक विद्यालयाला भेट... 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये विद्यार्थ्यांची निवड होण्याकरिता सुचविले अभिप्राय... 
 
d

तुळजापूर  - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A.) प्रवेश परीक्षेची तयारी करणे, राष्ट्रप्रेमाची व राष्ट्रसेवेची आवड निर्माण करणे, एकसंघ भावना जोपासणे व नेतृत्व गुणांचा विकास करून आत्मविश्वास पूर्ण समृद्ध व्यक्तिमत्व विकसित करणे, महाराष्ट्राची थोर व उज्ज्वल परंपरा जोपासणे या प्रमुख उद्देशाने तुळजापूर येथे तुळजाभवानी सैनिक विद्यालय स्थापन करण्यात आले होते. मात्र आजतागायत या शाळेतील एकही विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सामील न झाल्याची चिंताजनक बाब समोर आली . 

 सैनिकी शाळेचा उद्देश साध्य होत नसल्याने महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल गरजेचा असून यासाठी सैनिकी शाळा, सातारा येथील अभ्यासगट पाठविण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी सैनिकी शाळा सातारा चे प्राचार्य ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे यांच्याकडे केली होती. सदरील विनंतीच्या अनुषंगाने सैनिकी शाळा सातारा चे मनोज कुमार व  व्ही.एस.पाटील यांचा अभ्यासगट तुळजापूर येथे आला होता. यावेळी त्यांच्यासोबत वीर भगतसिंग अकॅडमी, ईट, ता. भूम चे संचालक प्रताप देशमुख व भाजयु मोर्चाचे तालुका अध्यक्ष  आनंद कंदले होते.

श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त बैठकीमध्ये आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून शाळेचा उद्देश सध्या करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्याची सूचना केली होती. सातारा सैनिक स्कूल च्या धर्तीवर तुळजापूर येथील सैनिकी शाळा विकसित करण्याच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीने नुकतीच शाळेला भेट देवून पाहणी केली. ग्रामीण भागातील युवकांना भारतीय सैन्य दलात उच्च पदस्थ अधिकारी पदावर निवड होण्याच्या अनुषंगाने सैनिकी शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सैनिकी शिक्षणाला चालना देणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, वसतिगृह, मेस सुविधा वाढविणे व मुख्य उद्देश एन.डी.ए. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातारा येथे राबवित असलेले उपक्रम श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे राबविण्याकरिता तज्ञ व्यक्तींचा अभ्यास गट अभिप्राय व सूचनांसह अहवाल सदर करणार आहे.

NCC प्रशिक्षण, लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक, भाषा आणि संवाद प्रशिक्षण, इंटर हाऊस चॅम्पियनशिप, प्रीफेक्टोरियल सिस्टम, NDA/IMA/AFA/NA/OTA/ ला भेटी देणे, कार्यशाळा आणि व्याख्याने, खेळ, पायाभूत सुविधा आणि कर्मचारी या व अशा विविध बाबींवर प्राथमिक अहवाल आलेला आहे. 

श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त यांच्या पुढील बैठकीत अहवालाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असून बैठकीमध्ये शाळेचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करून सैनिक शिक्षण व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये विद्यार्थ्यांची निवड होण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रम राबविण्यात आ. राणाजगजितसिंह पाटील हे आग्रही राहणार आहेत. 

From around the web