उस्मानाबादेत स्वातंत्र विद्यापीठासाठी जोरदार निदर्शने
उस्मानाबाद : स्वातंत्र विद्यापीठ यावरुन शुक्रवारी (दि.27) औरंगाबाद येथे सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले. शुक्रवारी रात्री व शनिवारी (दि.28) उस्मानाबाद शहरात सर्वच पक्ष, विविध संघटना यांनी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला. व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथे उपकेंद्र आहे. सध्या उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रुपांतर व्हावे, अशी अपेक्षा उस्मानाबाद जिल्हावाशीयांची आहे. त्यासाठी सिनेट सदस्य संजय निंबाळकर हे प्रयत्नशील होते. त्यानिमित्त सिनेट सदस्य संजय निंबाळकर हे बैठकीसाठी औरंगाबाद येथे विद्यापीठात गेले होते. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेची बैठक संपल्यानंतर सभागृहाबाहेरच रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्या अंगावर शाई फेकली.
या घटनेच्या उस्मानाबाद जिल्ह्याभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.28) सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील,अॅड. मिलिंद पाटील, संजय पाटील दुधगावकर, मसुद शेख, व्यापारी संघटनेचे संजय मंत्री, पत्रकार संघाचे धनंजय रणदिवे, वकील संघाचे अॅड देशमुख, बामुक्टो संघटनेचे प्रा. संजय कांबळे, अमित शिंदे, प्रा. नितीन पडवळ, आदित्य गोरे, शिवसेनेचे सतीश सोमाणी, अॅड. संजय भोरे, प्रविण कोकाटे, बापू साळुंके, काँग्रेसचे आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, जावेद काझी, अॅड विश्वजीत शिंदे, अय्याज शेख, इस्माईल शेख, असद शेख, वाजीद पठाण, बिलाल तांबोळी, रोहित पडवळ, पप्पु मुंडे, सोमनाथ गुरव, भिमा जाधव, अॅड.खंडेराव चौरे, लक्ष्मण माने, अॅड.विशाल साखरे, सुनिल काकडे, ओम नाईकवाडी, प्रविण पाठक, इंद्रजित देवकते, प्रसाद मुंडे, हिम्मत भोसले, विशाल पाटील, नंदकुमार गवारे, महेश पडवळ, आकाश माने, सचिन तावडे, मृत्यूंजय बनसोडे, अनिकेत पाटील, ओंकार नायगावकर, रोहित बागल, रणवीर इंगळे, राजाभाऊ बागल, सागर मोरे, मिनल काकडे, रवि कोरे, महेश गरड, गोपाळ देशमुख, डॉ. अतुल हुंबे, प्रा. महेश माने, प्रा. संतोष काळे, अजयकुमार माळी, राहुल गवळी, कुणाल निंबाळकर, अमित निंबाळकर, प्रविण निंबाळकर, आनंद निंबाळकर, मंगेश निंबाळकर, आनंद भोसले, मनोज मुदगल, अमित माने, अॅड. अतुल देशमुख आदी विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनास माझा पाठींबा : भाजपा आ.पाटील
या सर्वपक्षीय आंदोलनात भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सहभाग नोंदवत सिनेट सदस्य यांच्यावरील शाई हल्ल्याचा निषेध करत विद्यापीठ होईपर्यंत माझा या आंदोलनास पाठींबा राहिल, असे आश्वासन दिले.
विद्यापीठ होईपर्यंत संघर्ष करणार : संजय दुधगावकर
जिल्ह्यात 18 हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी 12 वी पास होतात.परंतू 30 टक्के विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे घेवू शकत नाहीत. उस्मानाबाद जिल्हा आंकाक्षीत जिल्ह्याच्या यादीमध्ये देशात तिसर्या तर आत्महत्याग्रस्त जिल्ह्याच्या यादीमध्ये दुसर्या स्थानावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वातंत्र विद्यापीठाची गरज आहे. विद्यापीठ मिळेपर्यंत ताकतीनीशी संघर्ष करणार व संजय निंबाळकरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आंदोलनास पाठींबा : अॅड मिलिंद पाटील
जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची होणारी अडचण व भविष्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उस्मानाबाद येथे होणार्या स्वातंत्र विद्यापीठासाठी भारतीय जनता पार्टी पाठींबा देत असल्याचे भाजपा नेते अॅड. मिलिंद पाटील यांनी सांगितले.
अल्पसंख्यांकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठ हवेच : शेख मसुद
जिल्ह्यात स्वातंत्र विद्यापीठ होणे गरजेची असून अल्पसंख्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी उस्मानाबादला स्वातंत्र विद्यापीठ हवेच, त्यामुळे या आंदोलनास आमचा जाहीर पाठींबा आहे. असे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सचिव मसुद शेख यांनी सांगितले.
सर्व काँग्रेसजण विद्यापीठासाठी पाठीशी : अग्निवेश शिंदे
जिल्ह्यातील स्वातंत्र विद्यापीठासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसजण तनमन धनाने विद्यापीठ होईपर्यंत आंदोलनासाठी सर्वाबरोंबर राहू, अशी ग्वाही काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी दिली.