श्री तुळजाभवानी पुजा-यास कारणे दाखवा नोटीस
तुळजापूर - येथील श्रीतुळजाभवानी मंदीरातील पुजा-यास श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने सिंहासन पेटी क्र २जवळ भाविकांना जास्त वेळ थांबवले असता मंदीर कर्मचाऱ्यांने जास्त वेळ थांबवु नका भाविकांना लवकर बाहेर घ्या असे म्हणताच हूज्जत घालत्याचा कारणावरुन पुढील तीन महिन्या पर्यत आपणास प्रवेश बंदी का करण्यात येवु नये अशा आशयाची नोटीस बजावुन सात दिवसाचा आत खुलासा सादर करावा असे म्हटलं आहे
पुजारी विश्वजीत मोहनराव पाटील रा . तुळजापूर यांनी दि 04/06/2022रोजी शनिवार दुपारी 12.21च्या दरम्यान सिंहासन पेटी क्रमांक दोन येथे भाविकांची गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेडदर्शन रांग गतीमान, हलवित असताना भाविकांनी पेडदर्शन रांगेतुन दर्शन घेवुन ही जास्त वेळ थांबवले असता मंदीर कर्मचाऱ्याने त्याना जास्त वेळ थांबवु नका भाविकांना लवकर बाहेर घ्या असे म्हणतच संबंधित मंदीर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत तु बाहेर ये तुला बघतो असे म्हणताच संबंधित कर्मचारी बाहेर गेला असता शिवागाळ केली असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सी.सी.टी.व्ही फुटेजचे अवलोकन करुन करण्यात आल्या नंतर देऊळ कवायत कलम 24 व 25 प्रमाणे मंदिर प्रशासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील 03 महिनेकरिता मंदिर प्रवेश बंदी करण्यांत येत आहे . तसेच सदर प्रवेश बंदी ही पुढील 6 महिनेपर्यंत कायम का करण्यात येऊ नये ? याचा लेखी खुलासा हा आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करावा ,असे आदेशात म्हटलं आहे.