नेतेगिरी करणारे प्रभारी मुख्याध्यापक बेताळे यांना कारणे दाखवा नोटीस 

उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचा दणका
 
zp

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कर्तव्यावर असलेल्या प्रभारी मुख्याध्यापक के.एम. बेताळे हे कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी बजावली आहे. 

दिलेल्या नोटीसमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या अर्थी  शाळा भेट अहवालानुसार आपण दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी शाळेत अनुपस्थित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, शाळा व्यवस्थापन विस्कळीत करणे, शाळेवर गैरहजर राहणे, शाळेतील सूचना वहीत पंचायत समिती तुळजापूर येथे कामकाजासाठी जातो असे नमूद करुन जिल्हा कार्यालयात येऊन बेबनाव करणे, शाळेची व प्रशासनाची दिशाभूल करणे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे आपण दुर्लक्ष करीत आहात असे माझ्या निदर्शनास आले आहे. 

त्यामुळे आपली कृती व वर्तन हे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील ३ चा भंग करणारे आहे. त्यामुळे आपल्या विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाई का अनुसरण यात येऊ नये ? याचा खुलासा ही नोटीस आपणास मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत करावा. खुलासा समाधान कारक न वाटल्यास अथवा मुदतीत प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई अनुसरण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे.

s

From around the web