वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि मस्के यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्यासमोर नांगी टाकली 

बेकायदेशीर अंबर दिवा प्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यास हात थरथर कापू लागले 
 
maske

उस्मानाबाद - सर्वसामान्य वाहनधारकांना  किरकोळ  कारणावरून दंड करणारे उस्मानाबाद जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि अमित व्ही. मस्के हे तहसीलदार गणेश माळी यांना बेकायदेशीर अंबर दिवा प्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यास धजावत नसल्याने आश्चर्य  व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी  आरटीओ आणि अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी हात झटकल्याने सपोनि अमित व्ही. मस्के यांची मोठी गोची झाली आहे. 

s

उस्मानाबादचे वादगस्त तहसीलदार  गणेश माळी यांनी आपल्या शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावला होता, त्याचे व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हने प्रसारित करताच, तहसीलदार  गणेश माळी यांनी शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा काढून ठेवला. परंतु बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी तहसीलदार  गणेश माळी  यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी आरटीओ आणि  वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली होती. 

s

या  तक्रारीनंतर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि अमित व्ही. मस्के यांनी आरटीओकडे मार्गदर्शन मागितले असता, पाचशे रुपये दंड करण्याचे निर्देश आरटीओनी दिले होते, तरीही जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि ए. व्ही. मस्के यांनी जिल्हादंडाधिकारी  यांच्याकडे पुन्हा मार्गदर्शन मागितले असता, दंड करण्याचे अधिकार जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडे असल्याचे सांगून हात झटकल्याने मस्के यांची मोठी गोची झाली आहे. 

सर्वसामान्य वाहनधारकांना किरकोळ कारणावरून दंड करणारे उस्मानाबाद जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि ए. व्ही. मस्के यांनी तहसीलदार  गणेश माळी यांच्यासमोर अखेर नांगी टाकली आहे.  बेकायदेशीर अंबर दिवा प्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यास त्यांचे हात थरथर कापू लागले आहेत. दरम्यान, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या सपोनि ए. व्ही. मस्के यांचेवर तात्काळ शिस्तभंग विषयक कारवाई  करावी, अशी मागणी होत आहे.

d

d

 

From around the web