उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील १६० गावामध्ये मातोश्री पाणंद योजनेतून २३८ किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी 

- आ. कैलास पाटील, शिवसेना 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील 160 गावांमध्ये मातोश्री पाणंद योजनेच्या माध्यमातुन 238 किलोमीटरचे रस्त्याना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यानी दिली आहे.आतापर्यंत तीन टप्प्यामध्ये गावातील रस्ते मंजुर झाले असुन अजुनही काही प्रस्तावीत रस्ते असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले आहे.ही योजना ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत महत्वाची भुमिका बजावणार असल्याचा विश्वास आमदार घाडगे पाटील यानी व्यक्त केला आहे. 

ठाकरे सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये ही योजना राबविण्यास मंजुरी दिली,योजनेत केलेल्या चांगल्या बदलामुळे ही योजना अल्प काळात लोकप्रिय ठरली आहे. ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे प्रश्न प्रलंबित असुन वर्षानुवर्षे प्रश्न अनेक कारणामुळे सुटलेले नाहीत.शेतकऱ्यांना रस्त्याअभावी शेतीमालाची वाहतुक करणे जोखीमीचे बनले होते,त्यांच्या सोय होऊन त्याना पुढील काळात अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.आता योजनेच्या माध्यमातुन सर्व अडथळे दुर होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे रस्ते करणे सोयीच ठरणार आहे.याचा विचार करुनच मतदारसंघासह उस्मानाबादमधील सर्वच गावामध्ये अधिकाधिक रस्ते होण्यासाठी प्रयत्न सूरु केल्याचे सांगुन पहिल्या टप्प्यामध्ये 28 गावामध्ये 30 किलोमीटरच्या रस्त्याना मंजुरी मिळवुन आणण्यात यश आल्याचे आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे. 

त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्येही उस्मानाबाद तालुक्यातील 52 गावांना 62 किलोमीटरचे तर कळंब तालुक्यातील 23 गावाना 29 किलोमीटरचे रस्ते मंजुर झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील यादी प्रसिध्द झाली असुन त्यामध्येही उस्मानाबाद तालुक्याच्या 32 गावामध्ये 57.5 किलोमीटर व कळंब तालुक्यातील 35 गावांना 59.5 असे रस्ते मंजुर झाले आहेत.तिसऱ्या टप्प्याच्या यादीचा विचार केला तर दोन्ही तालुक्यातील 67 गावामध्ये तब्बल 117 किलोमीटरचे रस्ते मंजुर करुन घेण्यात यश आले आहे.तीनही याद्यामध्ये दोन्ही तालुक्यातील कामांचा समावेश झाल्याने तब्बल 238 किलोमीटरचे रस्ते यामुळे निर्माण होणार आहेत. 

हे रस्त्याची कामे लवकर सूरु करण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या असुन दोन्ही तालुक्यामध्ये 160 गावापर्यंत ही योजना पोहचली आहे. बऱ्याच गावामध्ये कामांची संख्या एकापेक्षा अधिक असल्याचेही आमदार घाडगे पाटील यानी सांगितले.पुढील यादीमध्येही अनेक गावाच्या कामाचांही समावेश होणार असल्याचा विश्वास आमदार घाडगे पाटील यानी यावेळी व्यक्त केला.अधिक रस्त्याना निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब,फलोत्पादन तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे साहेब,पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब,  आमदार प्रा.तानाजी सावंत साहेब,खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले आहेत.

From around the web