प्रवासामध्ये हरवलेले दागिने केले परत

वाहक व चालकांचा प्रामाणिकपणा
 
s

उस्मानाबाद  - औरंगाबाद येथील अश्विनी बाळासाहेब आगे या औरंगाबादला जाण्यासाठी पारगाव येथून भूम येथून बस क्र.एम.एच.२० बीएल- १९६९ ने प्रवास करीत होत्या.  या प्रवासात त्यांच्या लहान मुलाच्या कानातील दागिना या बसमध्ये पडला. त्या औरंगाबाद येथे उतरल्यानंतर एका तासानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यांच्या गावातील विशाल रेपाळ सकाळी ८ वाजता भूम औरंगाबाद कर्तव्य करत होते.

सादर महिला औरंगाबाद येथे उतरून गेल्यानंतर एका तासानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या त्यांनी त्यांच्या गावातील विकास हाराळे यांच्याकडे संपर्क साधून हा प्रकार सांगून त्यांच्याकडून बस चालक व वाहक यांचा नंबर घेऊन तो दागिना सापडतोय का पहा ? अशी विनंती केली. त्यानंतर चालक व्ही.व्ही. देवाल व वाहक एस.जी. येवले यांनी गाडीची तपासणी करीत असताना सीट नं.९ च्या खाली ते दागिने खाली पडलेले असल्याचे आढळून आले. दागिने सापडल्याचे त्यांना
 सांगितल्यानंतर त्या औरंगाबाद आगारात आल्या. आगार प्रमुख एल.व्ही. लोखंडे यांच्या उपस्थितीत खात्री करून ते दागिने त्यांना परत करण्यात आले.

From around the web