मौजे मुर्शदपूरचे सरपंच बळवंत पाटील यांना दिलासा... 

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशास विभागीय आयुक्तांची स्थगिती 
 
s

उस्मानाबाद - शासकीय जागेत अतिक्रमण केले म्हणून मौजे मुर्शदपूरचे सरपंच बळवंत पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले होते. त्यांच्या या निर्णयास विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. 


लोहारा तालुक्यातील मौजे मुर्शदपूर ग्रामपंचायतची  निवडणूक  सन 2020 - 21 झाली होती.  त्यात बळवंत किसनराव पाटील यांचे पॅनल बहुमताने निवडून आले होते व त्यांची सरपंच म्हणून निवड झाली होती. विरोधी गटातील सदस्य पवन प्रकाश मोरे व कमलाकर घोडके  यांनी  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 नुसार सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य बळवंत पाटील यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशा अशयाचा अर्ज सादर केला. सदरील अर्जावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन व उपअधिक्षक भूमी अभिलेख, लोहारा, जि. उस्मानाबाद यांनी सादर केलेल्या अहवालावर अवलंबून राहून मुर्शदपुरचे सरपंच बळवंत पाटील यांना त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेली आहे असे म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले.

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशाच्या नाराजीने बळवंत पाटील यांनी ॲड. सुशांत चौधरी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे दिनांक 21/10/ 2022 रोजी अपील दाखल केले,  सदरील अपील  विभागीय आयुक्त यांच्यापुढे 23/11/2022 रोजी सुनावणी ठेवण्यात आले. अपीलकरत्यातर्फे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पारित केलेल्या आदेशात गंभीर चुका असून तक्रारदाराने तक्रारीमध्ये अपीलकर यांनी भुखंड क्रमांक 14 व 15 मधील सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे असे कथन केलेले आहे. 

प्रत्यक्षात अर्जदाराचे वडील किसनराव पाटील यांना  भुखंड क्रमांक 13 व 14 हा मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी वटप केलेला असुन भुखंड क्रमांक 15 हा घोडके यांना दिलेला आहे. दोन्ही भुखंडा च्या मधे सरकारी रस्ता नसुन सदरील भुखंड हा रिकामा आहे. पंचनामा करते वेळी मोकळ्या जागी कोणत्या प्रकारचे अतिक्रमण केले आहे याचा खुलासा होत नाही त्यामुळे सदरील पंचनामा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येनार नाही तसेच लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांस अशा प्रकारे अपात्र घोषित करण्यात येऊ शकत नाही. विधीज्ञांनी उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य धरुन . विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशास स्थगिती दिली.अपीलकर्ते बळवंत किसनराव पाटील यांची बाजू  ॲड. सुशांत चौधरी यांनी मांडली. प्रकरणातील पुढील तारीख 07/12/2022 रोजी ठेवण्यात आली आहे. 

From around the web