उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी रामेश्वर खनाळ
ढोकीला राऊत तर नळदुर्गला गोरे यांची नियुक्ती कायम
Updated: Apr 19, 2022, 13:28 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची बदली ऑर्डर
उस्मानाबाद - उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता या जागेवर वाशीचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ढोकीला जगदीश राऊत तर नळदुर्गला सिद्धेश्वर गोरे यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची बदली ऑर्डर पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी काढली आहे.
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद म्हणजे क्रीम पोस्टिंग समजली जाते. या जागेवर नियुक्ती होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा असते. काही दिवसापूर्वी गजानन घाडगे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर या रिक्त जागेवर वाशीचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची वर्णी लागली आहे.
सविस्तर ऑर्डर पाहा